Mumbai Indians Captaincy : हार्दिक-सूर्या संघाबाहेर… रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? नेमकं कारण काय?
Mumbai Indians Captaincy : सूर्यकुमार यादव देखील संघासोबत रायपूरला गेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तो वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत नाही.

Mumbai Indians captaincy IPL 2026 : आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. १० सामन्यांत केवळ तीन विजय मिळवलेला संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे. अशातच आता आसीबीविरुद्धच्या आगामी सामन्यापूर्वी संघासाठी एक मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघासोबत रायपूरला जाऊ शकला नाही, तर उपकर्णधार सूर्यकुमार यादवही वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत उपस्थित नाही.
हार्दिक-सूर्या आरसीबीविरुद्धच्या सामन्याला मुकणार
रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या १० मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी संघासोबत रायपूरला गेला नाही. बुधवार, ६ मे रोजी दुपारी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर मुंबई इंडियन्सचे खेळाडू जमले असताना हार्दिक पांड्या दिसला नाही. तो सामन्यापूर्वी संघात सामील होईल याचे अद्याप कोणतेही संकेत नाहीत. सूर्यकुमार यादवने कर्णधारपद भूषवलेल्या लखनौविरुद्धच्या मागील सामन्यातही हार्दिक खेळला नव्हता. हार्दिकच्या अनुपस्थितीचे कारण पाठीचे स्नायू आखडणे (बॅक स्पाझम) असल्याचे म्हटले जात होते.
The entire MI team traveled to Raipur, but Hardik Pandya was spotted in Mumbai with his girlfriend. 👀
It looks like there may be a controversy between Hardik and the MI management, which could be why he was sidelined.
Hardik Pandya looks fully fit. pic.twitter.com/GRokqHf4Zh
— Sonu (@Cricket_live247) May 6, 2026
दरम्यान, सूर्यकुमार यादव देखील संघासोबत रायपूरला गेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तो वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत नाही. परिणामी, असे मानले जात आहे की तो देखील १० मे आरसीबीविरुद्ध खेळताना दिसणार नाही. सूर्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबईला कर्णधारपदात पुन्हा एकदा बदल करावा लागेल.
कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार?
१. जसप्रीत बुमराह: नेतृत्व करण्यासाठी बुमराहचे नाव सर्वात पुढे आहे. मात्र, मागील १० सामन्यांत केवळ तीनच विकेट्स मिळाल्यामुळे त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
२. तिलक वर्मा: जर बुमराहला विश्रांती दिली, तर युवा तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात.
३. रोहित शर्मा: जर हे दोन्ही पर्याय वापरले गेले नाहीत, तर पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारे माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकतात.
प्लेऑफचे कठीण गणित –
मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आता अत्यंत धूसर झाल्या आहेत. १० सामन्यांनंतर संघाकडे फक्त ६ गुण आहेत. उर्वरित चारही सामने जिंकल्यास संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकेल, परंतु त्यासाठी इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. जर मुंबईचा पुढील सामन्यात पराभव झाला, तर त्यांचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात येईल. मुंबईचा पुढचा सामना १० मे रोजी आरसीबीविरुद्ध होणार आहे. त्यानंतर संघ पंजाब, केकेआर आणि राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.





