Virat Kohli Record : किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा जगातील एकमेवच खेळाडू
Virat Kohli Record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अवघ्या २३ धावा करुन इतिहास रचला आहे

Virat Kohli 9000 runs record in IPL : भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहलीने आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २७ एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात विराटने अशा विक्रमाला गवसणी घातली, जिथे पोहोचण्याचे स्वप्न जगभरातील फलंदाज पाहत आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना इतिहास रचला आहे. आयपीएल कारकिर्दीतील २७५ वा सामना खेळणाऱ्या विराटने या लीगमध्ये ९००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात हा पराक्रम करणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे.
केवळ ११ धावांची होती गरज –
Meet the first player to scale Mt. 9️⃣0️⃣0️⃣0️⃣ in the #TATAIPL! 🏔️
The man, the myth, the ultimate run-machine – Virat Kohli 🫡
Updates ▶️ https://t.co/HIiNNEutP0
##KhelBindaas | #DCvRCB | @imVkohli pic.twitter.com/z1PI1oshiJ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
या सामन्यापूर्वी विराटला ९ हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ११ धावांची आवश्यकता होती. आरसीबीच्या डावातील सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने हा ऐतिहासिक पल्ला गाठला. विराटने या धावा करण्यासाठी ६७३२ चेंडूंचा सामना केला आहे. या विक्रमासह त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, त्याला टी-२० क्रिकेटचा सर्वात महान फलंदाज का म्हटले जाते.
Virat Kohli has higher strike rate than rohit sharma in the IPL still rohit fans call him tuk tuk wtf irony man 🤣🤣🤣 pic.twitter.com/whjYxHkJxH
— Abdullah (@abdul_tweets03) April 27, 2026
धावांच्या शर्यतीत ‘विराट’ वर्चस्व –
Why take it deep when you can just finish it in 6.3 overs? ⏩💥
🎥 Back-to-back maximums from Virat Kohli to put the perfect finishing touch on a clinical performance! 🤌
Scorecard ▶️ https://t.co/HIiNNEutP0#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/4b2yUCDqLZ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट आता ७००० धावांवर असलेल्या रोहित शर्मापेक्षा खूप पुढे निघून गेला आहे. रोहितने २७६ सामन्यांत ७१८३ धावा केल्या आहेत, तर शिखर धवन ६७६९ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर (६५६५) आघाडीवर आहे.
विराटकडे या सामन्यात दिल्लीविरुद्ध १२०० धावा पूर्ण करण्याचाही विक्रम करण्याची संधी होती, परंतु ७६ धावांचे छोटे लक्ष्य असल्याने तो २७ धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. तरीही दिल्लीविरुद्ध सर्वाधिक ११८४ धावांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. या सामन्यात विराट कोहलीने १५ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार ठोकत आरसीबीला ६.३ षटकात ७६ धावांचे लक्ष्य गाठून दिले.





