IPL 2024 (MI vs RCB Match 25) : मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळला जाणारा IPL सामना या लीगमधील सर्वाधिक चर्चेचा सामना मानला जातो. हे दोन्ही संघ गुरुवारी (11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने येणार आहेत. या खडतर प्रतिस्पर्ध्यामध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर वरचष्मा राहिला आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी दुःखद स्वप्न ठरत आहे. किंग कोहली आता या संघाचा कर्णधार नसला तरीही हा संघ त्याच्या नावाशी जोडला गेला आहे. कोहली या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, पण त्याच्या संघाने आतापर्यंत चार सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत जर आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयाची नोंद करायची असेल, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन नव्हे तर सहा बदल करावे लागतील.
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या कालावधीत आरसीबीने 4 सामने गमावले असून एक सामना जिंकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉइंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहे. मात्र, त्यांना पुनरागमनाची संधी नाही, असे नाही. तरीही आरसीबी विजयी मार्गावर आला तर प्लेऑफमध्ये सहज पोहोचेल.
‘या’ 6 खेळाडूंना दाखवावा लागणार बाहेरचा रस्ता…
आयपीएल 2024 मध्ये, आरसीबीने अद्याप अनेक सामना विजेत्या खेळाडूंचा (Match Winner) अंतिम अकरामध्ये समावेश केलेला नाही. अशा स्थितीत मुंबईला घरच्या मैदानावर हरवायचे असेल तर त्याला आपला बलाढ्य संघ सोबत घ्यावा लागेल. मुंबईविरुद्ध आरसीबीला सौरव चौहान, कॅमेरून ग्रीन, मयंक डागर, रीस टोपले, यश दयाल आणि हिमांशू राणा यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. या सर्वांनी स्पर्धेत आतापर्यंत अपेक्षित कामगिरी केलेली नाही.
‘या’ खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली पाहिजे संधी…
कॅमेरून ग्रीनच्या जागी इंग्लिश अष्टपैलू विल जॅकला संधी मिळावी. स्फोटक फलंदाजीसोबतच जॅक ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो. याशिवाय स्पीड स्टार लॉकी फर्ग्युसनला रीस टोपलेच्या जागी संधी दिली जावी. महिपाल लोमरोर आणि आकाश दीप यांनाही अंतिम अकरामध्ये स्थान मिळायला हवे.
मुंबईविरुद्ध आरसीबीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि विजय कुमार वैशाख.