Virat Kohli Records : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! आयपीएलच्या इतिहासात ‘हा’ खास पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू
Virat Kohli Records : विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत विक्रमांची रांग लावली.

Virat Kohli 800 Fours 300 Sixes Record in IPL : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर असलेल्या विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्ये ८०० चौकार पूर्ण करण्याचा मान मिळवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्या खालोखाल शिखर धवन (७६८ चौकार) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
षटकारांचे झळकावले ‘त्रिशतक’ –
केवळ चौकारच नाही, तर विराटने या सामन्यात एक उत्तुंग षटकार खेचत आयपीएल कारकिर्दीतील ३०० षटकार पूर्ण केले. आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा विराट हा एकूण तिसरा आणि रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत ख्रिस गेल ३५७ षटकारांसह अव्वल स्थानी आहे, तर रोहित शर्मा ३१० षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने २७४ सामन्यांत हा टप्पा गाठला असून, एमएस धोनी (२६४) आणि एबी डिव्हिलियर्स (२५१) यांना त्याने मागे टाकले आहे.
🚨Kohli scored today 81 of 44 ball
He joined 300 sixes Club in IPL along with Gayle & Rohit🔥Virat reached this milestone after 273 Innings :
Four : 800, Sixes: 300He’s still dominating in IPL👑
RCB at 173/5 after 16th Over pic.twitter.com/Aoc3pRHm9n— MR. SINGH (@DIVYANSHU_89632) April 24, 2026
आयपीएलमधील सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू –
-
- विराट कोहली: ८०७ चौकार
- शिखर धवन: ७६८ चौकार
- डेविड वॉर्नर: ६६३ चौकार
Virat Kohli leading run scorer of IPL 2026. Simply the🐐. #ViratKohli #RCBvsGT pic.twitter.com/sMuck2hCQz
— AKRC MEDIA (@AkrcMedia) April 24, 2026
आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
- ख्रिस गेल: ३५७ षटकार
- रोहित शर्मा: ३१० षटकार
- विराट कोहली: ३०३ षटकार
या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूत ८१ धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये त्याने ८ चौकार आणि ४ षटकार ठोकले. यासह तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे. त्याचा हा धडाकेबाज फॉर्म पाहता, येत्या काही सामन्यांत तो रोहित शर्माचा षटकारांचा विक्रमही मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘रन मशीन’ कोहलीच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जगभरातील चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.





