Virat Kohli Angry : विराट कोहली आऊट झाल्यानंतर संतापला! ग्लव्हज-हेल्मेट दिलं फेकून, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Angry : आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली.

Virat Kohli Angry Video Viral : आयपीएल २०२६ च्या २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतरही ‘किंग’ विराट कोहली कमालीचा संतापलेला पाहायला मिळाला. बाद झाल्यानंतर त्याने मैदानात जे काही केले, त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. विराटने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. हार्दिक पंड्याने टाकलेल्या फुल टॉस चेंडूवर विराटने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू नीट टाइम करू शकला नाही. बाउंड्री लाईनवर सूर्यकुमार यादवने त्याचा सोपा झेल टिपला.
मैदानातच व्यक्त केला राग –
Virat Kohli – Showing anger? Why? 🤬
– Once you are at 42 off 31
– Other team’s openers are playing at 170+ SR
– Other RCB players are striking at 200+ SR
– And you end up scoring 50(38) at 131 SR
Say THANK YOU to Rajat Patidar — the real ultra booster of runs. 🔥 #RCBvsMI pic.twitter.com/N6MqsYKWqL
— Just In (@CricketPlus0) April 12, 2026
स्वतःची विकेट अशा पद्धतीने गमावल्यामुळे विराट कोहली प्रचंड नाराज दिसला. डगआउटकडे परतत असताना संतापाच्या भरात त्याने आपले ग्लव्हज काढले आणि जमिनीवर फेकून दिले. इतक्यावरच न थांबता त्याने आपले हेल्मेटही खाली आदळले. विराटला या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करायचे होते, मात्र स्वस्तात बाद झाल्याने त्याचा संयम सुटला. विराटच्या या आक्रमक वागणुकीवर आता मॅच रेफरी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चाहत्यांच्या चिंतेत भर; विराट क्षेत्ररक्षणाला आलाच नाही!
विराटच्या रागापेक्षाही जास्त चर्चा त्याच्या दुखापतीची रंगली आहे. मुंबई इंडियन्सच्या डावादरम्यान विराट कोहली क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. फलंदाजी करताना त्याच्या घोट्याला काहीतरी दुखापत झाल्याचे समजते, ज्यामुळे त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा पुढचा सामना १५ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट फिट होतो की नाही, याबाबत चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.





