IPL Live Cricket Score, MI vs DC, Indian Premier League 2024 : आज IPL 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत 10 व्या तर दिल्लीचा संघ दोन गुणासह 9 व्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं लागला आहे. मुंबईविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals win the toss & elect to field against @mipaltan
Follow the Match ▶ https://t.co/Ou3aGjoDih #TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/2PeWdOVdeR
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
दरम्यान, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 33 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एमआयने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत. उभय संघांमधील सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या मुंबई इंडियन्सने 218 धावांची केली होती. तर, दिल्ली कॅपिटल्सने एमआयविरुद्ध सर्वाधिक 213 धावा केल्या आहेत.