IPL 2024 (LSG vs GT Match 21) : यश ठाकूरचा पंच; लखनौचा गुजरातवर दणदणीत विजय…

Live Cricket Score, LSG vs GT Indian Premier League 2024 :आज, IPL 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने यश ठाकूरच्या पाच विकेट्स आणि कृणाल पंड्याच्या तीन विकेट्सच्या जोरावर गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला.गुजरात टायटन्सला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य होते, परंतु 18.5 षटकांत ते केवळ 130 धावांवरच गारद झाले.
या विजयासह लखनौ सुपरजायंट्स संघ सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर गुजरात टायटन्स संघ पाच सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभवांसह चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. लखनौने या मोसमात चांगली सुरुवात केली असून चारपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर एक सामना गमावला आहे.
लखनौ सुपरजायंट्सने 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातला वेगवान सुरुवात करून दिली होती. 5.5 षटकात गुजरातने बिनबाद 54 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यानंतर गुजरातचा डाव गडगडला आणि त्यांनी अवघ्या सात धावांतच चार विकेट्स गमावल्या आणि गुजरातची 8.5 षटकात 4 बाद 61 अशी व्यवस्था झाली. गुजरातने यादरम्यान शुभमन गिल, केन विलियमसन, साई सुदर्शन आणि शरथ बीआर यांच्या विकेट गमावल्या. गिलने 21 चेंडूत 19 तर सुर्दशनने 23 चेंडूत 31 धावा केल्या. विल्यमसन 1 आणि शरथ 2 धावा करून माघारी परतला.
नवोदित शरथ बीआरला बाद केल्यानंतर कृणाल पांड्याने आणखी एक आणि गुजरात टायटन्सला पाचवा धक्का दिला. दर्शन नळकांडे 12 धावा करून बाद झाला. कृणालने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. क्रुणालची ही डावात तिसरी विकेट होती. 12 षटकात 80 धावांवर गुजरातच निम्मा संघ माघारी परतला होता. त्यानंतर विजय शंकर 17 धावांवर ,राशिद खान शून्यावर, उमेश यादव 2 धावा,अहमद 4 आणि रवी तैवतिया 30 काढून झटपट बाद झाले.अशाप्रकारे गुजरातचा संघ 18.5 षटकांत 130 धावांत संपुष्टात आला आणि सामना 33 धावांनी गमावला.
लखनौ सुपर जायंट्ससाठी यश ठाकूर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. यश ठाकूरने 3.5 षटकांत 30 धावांत 5 फलंदाज बाद केले. कृणाल पांड्याने गुजरात टायटन्सच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवले. तर रवी बिष्णोईला 1 यश मिळाले.
तत्पूर्वी, या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या. लखनौ सुपरजायंट्सकडून मार्कस स्टॉइनिसने अर्धशतक झळकावले. त्याने 43 चेंडूंचा सामना करत 58 धावा केल्या. स्टॉइनिसच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त निकोलस पूरनने 22 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या तर कर्णधार राहुल 31 चेंडूत 33 धावा करून बाद झाला.आयुष 11 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. तर क्विंटन डिकॉक 6 आणि देवदत्त पडिक्कल 7 धावा काढून स्वस्तात माघारी परतले.
गुजरातकडून गोलंदाजीत उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. त्याने 3 षटकात 22 धावा देत 2 बळी घेतले. दर्शन नलकंडेलाही 2 बळी मिळाले. त्यासाठी त्याने 2 षटकात 21 धावा दिल्या. राशिद खानने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला. तर मोहित शर्माची गोलंदाजी सर्वात महागडी ठरली. त्याने 4 षटकात 34 धावा दिल्या अन् त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.





