LSG vs GT : गुजरातने लखनौवर मात करत नोंदवला सलग दुसरा विजय! प्रसिध कृष्णासह गिल-बटलर बजावली महत्त्वाची भूमिका
LSG vs GT : विजयासह गुजरातने हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे, तर लखनौला आपल्याच घरच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागला.

LSG vs GT Gujarat Titans won by 7 wickets : आयपीएल २०२६ च्या १९ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) दमदार प्रदर्शन करत यजमान लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे, तर लखनौला आपल्याच घरच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातने १८.४ षटकांत विजय नोंदवला.
भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौची सुरुवात निराशाजनक झाली. मिचेल मार्श (११) आणि कर्णधार ऋषभ पंत (१८) स्वस्तात बाद झाल्यामुळे लखनौचा संघ अडचणीत आला होता. एडन मार्करमने २१ चेंडूत ३० धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसिध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीपुढे लखनऊची मधली फळी पत्त्याच्या घरासारखी कोसळली.
A clinical performance by #GT to make it 2️⃣ wins in 2️⃣ games
The @gujarat_titans reach 5th spot on the points table with this away win ✌️
SCORECARD ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/d0BghVD5kY
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
प्रसिध कृष्णाने लगावला विकेट्सचा ‘चौकार’ –
Innings Break!
Prasidh Krishna’s best #TATAIPL figures keep #LSG to 164/8 🫡
Will #GT chase it down to register their second win of the season? 🤔
Updates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/eLON7m3k1X
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
लखनौच्या डावात निकोलस पूरन (१९), अब्दुल समद (१८) आणि मुकुल चौधरी (१८) यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठ्या धावसंख्येत त्याचे रूपांतर करता आले नाही. मोहम्मद शमीने शेवटच्या टप्प्यात ५ चेंडूत नाबाद १२ धावा केल्यामुळे लखनौला ८ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून प्रसिध कृष्णाने २८ धावांत ४ बळी घेत लखनौचे कंबरडे मोडले, तर अशोक शर्माने २ बळी टिपले.
गिल आणि बटलरची निर्णायक भागीदारी –
50 number 2️⃣6️⃣ for The BOSS in #TATAIPL 😎
Jos Buttler racing #GT towards another win 🏎️@gujarat_titans need 37 runs from 36 balls
Updates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/d7iOnQl5ai
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
प्रत्युत्तरात १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात सकारात्मक झाली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन (१५) यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. सुदर्शन बाद झाल्यावर मैदानात आलेल्या जोस बटलरने कर्णधार शुबमन गिलसोबत ८४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. गिलने ४० चेंडूत ५६ धावा केल्या, तर बटलरने अवघ्या ३७ चेंडूत ६० धावांची खेळी साकारली. या दोघांच्या अर्धशतकांमुळे गुजरातचा विजय सुकर झाला. शेवटी वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी शांतपणे सामना संपवत गुजरातला विजय मिळवून दिला.





