Jos Buttler Record : लखनौमध्ये जोस बटलरचं वादळ! ६० धावांच्या खेळीसह इतिहास रचला; एलेक्स हेल्स आणि पोलार्डलाही टाकलं मागे
Jos Buttler Record : गुजरात टायटन्सचा (GT) स्फोटक सलामीवीर जोस बटलर याने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

Jos Buttler 14000 T20 Runs Record : इकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात जोस बटलरच्या बॅटने आग ओकली. लखनौने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलरने ६० धावांची मॅचविनिंग खेळी केली, ज्यामुळे गुजरातने हा सामना ७ गडी राखून सहज जिंकला. या खेळीदरम्यान बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. हा टप्पा गाठणारा तो जगातील केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे.
तिसरा सर्वात वेगवान फलंदाज –
जोस बटलरने १४,००० धावांचा टप्पा ४६८ डावांमध्ये पूर्ण केला आहे. सर्वात कमी डावांमध्ये हा विक्रम करण्याच्या यादीत तो आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याबाबतीत त्याने अॅलेक्स हेल्स आणि किरॉन पोलार्ड यांना मागे टाकले आहे. या यादीत ख्रिस गेल (४२३ डाव) पहिल्या, तर डेव्हिड वॉर्नर (४३१ डाव) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
50 number 2️⃣6️⃣ for The BOSS in #TATAIPL 😎
Jos Buttler racing #GT towards another win 🏎️@gujarat_titans need 37 runs from 36 balls
Updates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/d7iOnQl5ai
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांची यादी:
१४,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत बटलर आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे:
- ख्रिस गेल: १४,५६२ धावा
- किरॉन पोलार्ड: १४,४८२ धावा
- अॅलेक्स हेल्स: १४,४४९ धावा
- डेव्हिड वॉर्नर: १४,१२१ धावा
- जोस बटलर: १४,०२१ धावा
शंभराव्या अर्धशतकाचा धमाका –
जोस बटलरसाठी हा हंगाम खास ठरत आहे. त्याने आतापर्यंत ४९७ टी-२० सामन्यांमध्ये ३५.०५ च्या सरासरीने १४,०२१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या नावावर ८ शतके आणि १०० अर्धशतके नोंदवलेली आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने ६०० षटकारांचा टप्पाही गाठला होता. सुरुवातीच्या काही सामन्यांत शांत राहिलेली बटलरची बॅट आता फॉर्ममध्ये परतल्याने प्रतिस्पर्धी संघांचे धाबे दणाणले आहेत.





