LSG vs GT : धक्कादायक! निकोलसच्या आक्रमक शॉटने चाहत्याचं फुटलं डोकं, VIDEO होतोय व्हायरल

LSG vs GT Nicholas Pooran shot splits fan head video viral : आयपीएल २०२५ चा २६ वा सामना १२ एप्रिल रोजी लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात यजमान संघ लखनौने गुजरातचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनची फटकेबाजी पाहायला मिळाली. दरम्यान पूरनच्या या फटकेबाजीचा एका चाहत्याला चांगलाच फटका बसला आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या त्याच्या ६१ धावांच्या खेळीदरम्यानही असेच दिसून आले. जीटीविरुद्ध पूरनने फक्त एक चौकार आणि ७ षटकार मारले. मात्र, यापैकी एक शॉट स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्यालाही लागला, ज्यामुळे त्याचे डोके फुटले. ज्यामुळे चाहत्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चेंडू डोक्याला लागल्याने त्याला रुग्णालयात जावे लागले यावरून त्याच्या दुखापतीची व्याप्ती किती होती याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या काळात त्याला उपचार प्रक्रियेतून जावे लागले. जिथे त्याच्या डोक्याला एकूण आठ टाके घ्यावे लागले.
डोके फुटल्यानंतरही चाहत्याचा उत्साह कमी झाला नाही –
लखनऊ के इकाना स्टेडियम में पूरन ने ऐसा छक्का मारा जो गेंद सीधे दर्शक के सिर पर जाकर लगी और बंदा घायल हो गया। उसका सिर पूरा फूट गया और लहूलुहान हो गया, लेकिन बंदा दोबारा मैच देखने से बाज नहीं आया.. #LSGvGT #NicholasPooran pic.twitter.com/6we7QynpiE
— Gaurav Pandey (@gaurav5pandey) April 13, 2025
मात्र, डोके फुटले तरी, या क्रिकेटप्रेमींचा उत्साह कमी झाला नाही. उपचार घेतल्यानंतर तो पुन्हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला. @gaurav5pandey नावाच्या एका चाहत्याने जखमी माणसाचा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, ‘लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये पूरनने असा षटकार मारला की चेंडू थेट प्रेक्षकाच्या डोक्यात लागला. ज्या तो जखमी झाला.’ त्याचे डोके फुटले होते आणि रक्तस्त्राव होत होता, पण तो चाहता उपचार घेऊन पुन्हा सामना पाहण्यासाठी आला.’
हेही वाचा – SRH vs PBKS : मैदानातच चेंडू हरवल्यामुळे गोंधळला इशान किशन, नक्की काय घडलं? पाहा VIDEO
पूरनच्या धमाकेदार खेळीमुळे रोखला गुजरातचा विजयरथ –
Where can you find fireworks tonight? 🎆 🤔
In Lucknow, from the bat of Nicholas Pooran 😎
Updates ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT | @nicholas_47 pic.twitter.com/Lb9E6XQoPB
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
सामन्यादरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या निकोलस पूरनने एकूण ३४ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने १७९.४१ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि सात उत्कृष्ट षटकार आले. त्याच्याशिवाय, एडेन मारक्ररमने डावाची सुरुवात करताना ३१ चेंडूत ५८ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – SRH vs PBKS : मैं कहीं नहीं गया…! शतक झळकावताच अभिषेकने चिट्ठी दाखवत पंजाबला डिवचलं? पाहा VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, निकोलस पूरनच्या स्फोटक फलंदाजीमुळे लखनौ संघाने सहा विकेट्सनी सामना जिंकण्यात यश मिळवले. भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, गुजरात टायटन्सच्या संघाला २० षटकांत सहा गडी गमावून १८० धावा करता आल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सने १९.३ षटकांत चार गडी गमावून सहज विजय मिळवला.





