Live Cricket Score, LSG vs GT Indian Premier League 2024 :
सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या असून गुजरातला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौ सुपरजायंट्सकडून मार्कस स्टॉइनिसने अर्धशतक झळकावले. त्याने 43 चेंडूंचा सामना करत 58 धावा केल्या. स्टॉइनिसच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
Innings Break ‼️
Marcus Stoinis’ crucial knock of 58 and Nicholas Pooran’s late flourish in the slog overs help #LSG set #GT a target of 1️⃣6️⃣4️⃣🎯
Folks, which way is this one heading? 🤔
Scorecard ▶ https://t.co/P0VeELamEt#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/bj3lbuMpoD
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
याव्यतिरिक्त निकोलस पूरनने 22 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या तर कर्णधार राहुल 31 चेंडूत 33 धावा करून बाद झाला.आयुष 11 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. तर क्विंटन डिकॉक 6 आणि देवदत्त पडिक्कल 7 धावा काढून स्वस्तात माघारी परतले.
गुजरातकडून गोलंदाजीत उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. त्याने 3 षटकात 22 धावा देत 2 बळी घेतले. दर्शन नलकंडेलाही 2 बळी मिळाले. त्यासाठी त्याने 2 षटकात 21 धावा दिल्या. राशिद खानने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला. तर मोहित शर्माची गोलंदाजी सर्वात महागडी ठरली. त्याने 4 षटकात 34 धावा दिल्या अन् त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.