Rishabh Pant Form : करोडोंची बोली पण कामगिरी शून्य! ऋषभचा खराब फॉर्म लखनौसाठी डोकेदुखी; वैभवच्या षटकारांनीच टाकलं मागे
Rishabh Pant Form : ऋषभ पंतच्या कामगिरीची तुलना आता राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्याशी केली जात आहे.

Rishabh Pant Poor Form IPL 2026 : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आणि लखनौ सुपर जाएंट्सचा (LSG) कर्णधार ऋषभ पंत याची बॅट यंदाच्या हंगामात पूर्णपणे शांत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोट्यवधींच्या बोलीत संघात सामील झालेल्या पंतला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत असून, त्याच्या या खराब फॉर्ममुळे लखौच्या चिंतेत भर पडली आहे.
आज(१२ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. मिचेल मार्श लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने २ चौकार आणि १ षटकार मारून चांगली सुरुवात केली होती, मात्र अवघ्या १८ धावांवर तो मोहम्मद सिराजच्या चेंडूवर बाद झाला. फलंदाजीच्या क्रमवारीत वारंवार बदल करूनही पंतला आपली लय सापडलेली नाही.
बॅटिंग पोझिशन बदलली, पण नशीब नाही –
27 करोड़ का चक्कर बाबू भइया 😂
मुझे डर है कि गोयनका साहब रोने न लगे 😁#LSGvsGT #RishabhPant #IPL2026 pic.twitter.com/MeZzb9Qrl5— Anamika Pal (@BindasWith) April 12, 2026
गेल्या हंगामात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या पंतने यंदाच्या पहिल्या सामन्यात सलामीला फलंदाजी केली होती. तिथे अपयश आल्यावर तो तिसऱ्या क्रमांकावर आला. दुसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध नाबाद ६८ धावांची खेळी करून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता, परंतु त्यानंतरच्या सामन्यांमध्ये (कोलकाताविरुद्ध १० आणि गुजरातविरुद्ध १८) तो १०-२० धावांचा टप्पाही ओलांडू शकलेला नाही. ४ डावांत पंतने केवळ १०३ धावा केल्या आहेत.
१५ वर्षांच्या वैभवचा पंतला आरसा!
ऋषभ पंतच्या कामगिरीची तुलना आता राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्याशी केली जात आहे. पंतने ४ सामन्यांत एकूण १०३ धावा केल्या आहेत, तर वैभवने आतापर्यंत तब्बल १८ षटकार खेचले आहेत. म्हणजेच वैभवने केवळ षटकारांच्या मदतीने १०८ धावा जमवल्या आहेत, ज्या पंतच्या एकूण धावसंख्येपेक्षा जास्त आहेत. आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूची कामगिरी एका १५ वर्षांच्या मुलासमोर फिकी पडत असल्याचे पाहून क्रीडा विश्वात चर्चांना उधाण आले आहे.





