IPL 2024 (LSG vs CSK Match 34) : चेन्नईला विजयी हॅटट्रिकची संधी, आज लखनौविरूध्द रंगणार लढत…

IPL 2024, Live Cricket Score (LSG vs CSK Match 34) : आयपीएल 2024 चा 34 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर आज (शुक्रवार, 19 एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनौ सुपर जायंट्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघांनी जोरदार दावेदारी केली आहे, त्यामुळे हा सामना रोमांचक होऊ शकतो. एलएसजीने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर तेवढेच सामने गमावले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. रुतुराज गायकवाडचा CSK संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने सलग 2 सामने जिंकलेत. त्यामुळे चेन्नईला आता लखनऊ विरुद्ध विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौसमोर पराभवाची हॅटट्रिक रोखण्यासाठी चेन्नईवर विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे.
दरम्यान, एकना क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीचा पृष्ठभाग फलंदाजांसाठी अनुकूल मानला जातो. पण येथे फिरकीपटूंनाही मदत मिळताना दिसत आहे. हे IPL 2023 मधील सर्वात कमी धावसंख्येचे मैदान आहे, पहिल्या डावातील सरासरी स्कोअर सुमारे 147 आहे. कदाचित, या ठिकाणी पाठलाग करणे अधिक कठीण आहे कारण प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी तीन सामने जिंकले आहेत.





