LSG vs CSK : धोनीने केला निकोलस पूरनचा स्वप्नभंग! ‘या’ मोठ्या विक्रमापासून फक्त १ धाव राहिला दूर

LSG vs CSK MS Dhoni break Nicholas Pooran dream : आयपीएल २०२५ मधील ३० वा सामना सीएसके विरुद्ध एलएसजी संघात खेळला जात आहे. या सामन्यात निकोलस पूरन सीएसकेविरुद्ध एक मोठा विक्रम करण्यापासून वंचित राहिला. तो मोठा पराक्रम साध्य करण्यापासून फक्त १ धाव दूर राहिला. त्याचे हे स्वप्न एमएस धोनीने स्वप्न भंग केले. या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला पूरन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. तो लखनौसाठी फार काही करू शकला नाही. एमएस धोनीने त्याचे स्वप्न भंग केले.
निकोलस पूरनचे स्वप्न भंगले –
खरंतर, निकोलस पूरन टी-२० मध्ये ९ हजार धावा काढण्यापासून वंचित राहिला. जर सीएसकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पूरनने ९ धावा केल्या असत्या, तर तो वेस्ट इंडिजकडून ९ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला असता. पण एमएस धोनीने त्याचे स्वप्न भंग केले. या सामन्यात निकोलस एलबीडब्ल्यू आऊट झाला. एमएस धोनीने रिव्ह्यू घेतला आणि निकोलसला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले.
Another sharp review from MS Dhoni pays off as Nicholas Pooran is dismissed. The Dhoni Review System continues to deliver.#LSGvCSK pic.twitter.com/vr0ha9zTJv
— Er Pashupati Mishra (@Pashupati8797) April 14, 2025
या सामन्यात त्याने ९ चेंडूत ८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने २ चौकारही मारले. त्याला अंशुल कंबोजने बाद केले. पूरण उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध ७५, एसआरएचविरुद्ध ७०, पंजाबविरुद्ध ४४, एमआयविरुद्ध १२, केकेआरविरुद्ध ८७* आणि जीटीविरुद्ध ६१ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – DC vs MI सामन्यात तुफान राडा! मैदानात खेळाडू अन् स्टँडमध्ये भिडले चाहते, VIDEO व्हायरल
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे वेस्ट इंडिजचे फलंदाज :
ख्रिस गेल – १४५६२
किरॉन पोलार्ड – १३५३७
आंद्रे रसेल – ९०२५
निकोलस पूरन – ८९९९
आंद्रे फ्लेचर- ७९१४
ड्वेन स्मिथ – ७८७०





