LSG vs CSK : एमएस धोनीचा आणखी एक पराक्रम! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

LSG vs CSK MS Dhoni Sets Historic IPL Record with 200 Dismissals : जेव्हा जेव्हा एमएस धोनी आयपीएलमध्ये सामना खेळायला येतो, तेव्हा कोणता ना कोणता विक्रम त्याची वाट पाहत असतो. सोमवारी, जेव्हा एलएसजी आणि एलएसजी यांच्यात सामना खेळला गेला, तेव्हा धोनीच्या निशाण्यावर एक विक्रम होता, ज्याला त्याने पहिल्याच डावात स्पर्श केला. एवढेच नाही तर धोनीने जे यश मिळवले आहे, ते जगातील कोणत्याही खेळाडूला आयपीएलमध्ये यापूर्वी मिळवता आलेले नाही.
धोनी आयपीएलमध्ये २०० फलंदाजांना आऊट करणारा पहिलाच खेळाडू ठरला –
महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५४ झेल घेतले आहेत आणि या काळात ४६ स्टंपिंगही केल्या आहेत. एवढेच नाही तर धोनीने आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून चार झेलही घेतले आहेत. जर आपण हे सर्व जोडले तर हा आकडा २०० पर्यंत पोहोचतो. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २७१ सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एलएसजीचा फलंदाज आयुष बदोनीला यष्टीचीत करताच धोनीने हा २०० खेळाडूंना आऊट करण्याचा टप्पा पूर्ण केला.
Safe as a house 🏡
MS Dhoni completes his 2⃣0⃣0⃣th #TATAIPL dismissal 🫡
He becomes the first player to achieve this feat 👏#LSGvCSK | @msdhoni pic.twitter.com/jNpU0uH5cR
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
धोनी-जडेजाची जोडी ठरली सुपरहिट –
रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धोनीची आयपीएलमधील हा नववी स्टंपिंग आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त तीन यष्टिरक्षक आणि गोलंदाज जोड्या आहेत, ज्यांनी हे काम नऊ वेळा केले आहे. दिनेश कार्तिकने अमित मिश्राच्या गोलंदाजीवर नऊ स्टंपिंग केल्या आहेत, तर अॅडम गिलख्रिस्टने प्रज्ञान ओझाच्या गोलंदाजीवर नऊ स्टंपिंग केल्या आहेत. आता धोनीने त्यांची बरोबरी केली आहे. जर या हंगामात जडेजा आणि धोनीने आणखी एकदा असे केले तर ते पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचतील.
हेही वाचा –LSG vs CSK : धोनीने केला निकोलस पूरनचा स्वप्नभंग! ‘या’ मोठ्या विक्रमापासून फक्त १ धाव राहिला दूर
धोनीने अश्विनच्या चेंडूवर ८ वेळा स्टंपिंग केल्या आहेत. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर नऊ वेळा स्टंपिंग करण्याव्यतिरिक्त, एमएस धोनीने १० झेल देखील घेतले आहेत. म्हणजेच एकूण आकडा १९ वर पोहोचला आहे. या बाबतीत ऋषभ पंत आणि कागिसो रबाडा पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्या जोडीने स्टंपिंग आणि कॅचिंग करून २० विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – DC vs MI सामन्यात तुफान राडा! मैदानात खेळाडू अन् स्टँडमध्ये भिडले चाहते, VIDEO व्हायरल
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे, एलएसजीने सीएसकेसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार पंतने ६३, मार्शने ३०, बदोनी आणि समदने अनुक्रमे २२ आणि २० धावा केल्या. चेन्नईकडून जडेजा आणि पाथिरानाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर खलील आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





