LSG vs CSK : सीएसकेचे जबरदस्त कमबॅक! पाच पराभवानंतर लखनौवर नोंदवला दणदणीत विजय

LSG vs CSK Chennai Super Kings beat Lucknow Super Giants by 5 wickets : चेन्नई सुपर किंग्जने अखेर त्यांची पराभवाची मालिका खंडित केली आहे. सलग पाच सामने गमावल्यानंतर, चेन्नईने हंगामातील दुसरा विजय नोंदवला. लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला १६७ धावा करायच्या होत्या आणि संघाने शेवटच्या षटकात लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात एमएस धोनीची कामगिरी उत्कृष्ट होती.
सीएसकेचे पाच पराभवानंतर जबरदस्त कमबॅक –
त्याने ११ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्याशिवाय शिवम दुबेने ३७ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीत २ षटकार आणि ३ चौकार मारले. रचिन रवींद्रने ३७ आणि शेख रशीदने २७ धावा करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली.
Doing what he does best 💛 🫡
For his brilliant finishing act of 26*(11) and yet another 🔝 effort behind the stumps, #CSK skipper MS Dhoni is the Player of the Match 🙌 💥
Scorecard ▶ https://t.co/jHrifBkT14 #TATAIPL | #LSGvCSK | @msdhoni pic.twitter.com/Xcw0whVQo4
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
१५ व्या षटकात धोनीची मैदानात एन्ट्री –
Vintage Finisher 😎
MS Dhoni Turns Back the Clock with Match-Winning 26*(11) 🔁
🔽 Watch | #TATAIPL | #LSGvCSK | @msdhoni
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
१५ व्या षटकात धोनी मैदानात आला. दिग्वेश राठीने शंकरला बाद केले आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने १११ धावांत पाच विकेट गमावल्या. यानंतर, धोनीसमोर मैदानात येताच जलद फलंदाजी करण्याचे आव्हान होते. कारण क्रीजवर उपस्थित असलेला शिवम दुबे खूप संघर्ष करत होता. यानंतर धोनीने पण आवेश खानच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग दोन चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले.
हेही वाचा – LSG vs CSK : एमएस धोनीचा आणखी एक पराक्रम! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
१७ व्या षटकात, धोनीने शेवटच्या चेंडूवर एक शानदार षटकार मारला, त्यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने वळू लागला. आवेश खानने १८ व्या षटकात चांगली गोलंदाजी केली, त्या षटकात फक्त ७ धावा झाल्या पण या षटकातही धोनीने चौकार मारला. १९ व्या षटकात शिवम दुबेने एक चौकार आणि एक षटकार मारला आणि शेवटी १९ व्या षटकात धोनीने चौकार मारला. यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने गेला आणि शेवटी दुबेने चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.
हेही वाचा – LSG vs CSK : धोनीने केला निकोलस पूरनचा स्वप्नभंग! ‘या’ मोठ्या विक्रमापासून फक्त १ धाव राहिला दूर
ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे एलएसजीने उभारली होती सन्मानजनक धावसंख्या –
The IMPACT player does it with MAX IMPACT 🤩
Shivam Dube 🤝 MS Dhoni with a match-winning partnership 💛@ChennaiIPL are 🔙 to winning ways 😎
Scorecard ▶ https://t.co/jHrifBlqQC #TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/AI2hJkT9Dt
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
तत्पूर्वी ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे, एलएसजीने सीएसकेसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार पंतने ६३, मार्शने ३०, बदोनी आणि समदने अनुक्रमे २२ आणि २० धावा केल्या. चेन्नईकडून जडेजा आणि पाथिरानाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर खलील आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





