IPL 2024 (GT vs RR Match 24) : पाऊस थांबला..! गुजरातने राजस्थानविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार गिलने घेतला ‘हा’ निर्णय…

Live Cricket Score, RR vs GT, Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा 24 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार होता. मात्र पावसामुळे सामन्यास उशीर झाला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
सध्या जयपूरमध्ये पाऊस थांबला असून जमिनीवरून कव्हर काढण्यात आले आहेत. आता नाणेफेक (Toss) 7:25 वाजता झाला असून, पहिला चेंडू 7:40 वाजता टाकला जाईल. नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Gujarat Titans win the toss and elect to field against Rajasthan Royals.
Follow the Match ▶️ https://t.co/1HcL9A97Ch#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/Hw76YqvfOW
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
आयपीएल 2024 मध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जयपूरमध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला. राजस्थान आणि गुजरात यांच्यात होणारा सामना खूपच रंजक ठरू शकतो. आता पावसामुळे दोन्ही संघांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू स्किट होईल. याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. जमिनीवर हलके पाणी असेल. याचा परिणाम क्षेत्ररक्षणादरम्यान होईल.
IPL 2024 (GT vs RR Match 24) : जयपूरमध्ये पावसामुळे वाढली डोकेदुखी, राजस्थान-गुजरात सामन्याला उशीर…
राजस्थान आणि गुजरात ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यातील संघर्ष आणि आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. गुजरातने यापैकी चार सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे. मात्र, गुजरातने जे चार सामने जिंकले ते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली होते. आता तो मुंबईच्या संघात गेला आहे.
शुभमनच्या नेतृत्वाखालील गुजरात संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा संघ सध्या चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. चार सामन्यांत त्यांचे आठ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. त्याच वेळी, चार संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दोन संघांचे प्रत्येकी चार गुण आणि तीन संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. अशा स्थितीत या वेळी अंतिम चारमध्ये पोहोचण्याची लढत अत्यंत रंजक असणार आहे.





