RR vs GT : गिलची फटकेबाजी अन् राशिदच्या फिरकीची कमाल! गुजरातने राजस्थानला त्यांच्याच घरात लोळवतं ठोकला विजयाचा चौकार
RR vs GT : गुजरात टायटन्सने सलग चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत टॉप-२ मध्ये एन्ट्री मारली आहे.

RR vs GT Gujarat Titans won by 77 runs : आयपीएल २०२६ मधील ५२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) राजस्थान रॉयल्सचा (RR) त्यांच्याच घरच्या मैदानात धुव्वा उडवला. सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या एकतर्फी लढतीत गुजरातने राजस्थानचा ७७ धावांच्या मोठ्या अंतराने पराभव केला. गुजरातने ठेवलेल्या २३१ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव अवघ्या १५२ धावांत आटोपला.
शुबमन-साईची शतकीय सलामी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात टायटन्सला कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी स्वप्नवत सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ६५ चेंडूंत ११८ धावांची भागीदारी रचली. साई सुदर्शनने ३६ चेंडूंत ५५ धावा केल्या, ज्यामध्ये ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याला यश राज पुंजा याने बाद केले.
A 𝙏𝙞𝙩𝙖𝙣𝙞𝙘 𝙑𝙞𝙘𝙩𝙤𝙧𝙮 by 7⃣7⃣ runs✌️
4⃣th consecutive win for @gujarat_titans as they move to no.2⃣ in the Points Table 🔢
This is also #GT‘s biggest #TATAIPL win (by runs) 👏👏
Scoreboard ▶️ https://t.co/t7CEEL9Bzp#KhelBindaas | #RRvGT pic.twitter.com/jXKWcdBfru
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026
त्यानंतर कर्णधार शुबमन गिलने मैदानाचा ताबा घेत ४४ चेंडूंत ८४ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार होते. जोस बटलर (१३) आणि जेसन होल्डरच्या छोटेखानी योगदानामुळे गुजरातने २० षटकांत २२९ धावांचा विशाल टप्पा गाठला.
Innings Break!
A solid opening act by #GT propels them to a strong total in Jaipur 🎯
Will it be enough or will #RR chase it down? 🤔⏳
Scorecard ▶️ https://t.co/t7CEEL9Bzp#TATAIPL | #KhelBindaas | #RRvGT pic.twitter.com/QYvk4jMVGo
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026
राजस्थानच्या फलंदाजांची सपशेल शरणागती –
🚨 Big wicket alert
Mohd. Siraj with the priceless wicket Vaibhav Sooryavanshi ☝️
Updates ▶️ https://t.co/t7CEEL9Bzp#TATAIPL | #KhelBindaas | #RRvGT pic.twitter.com/bg6Wm5VpX1
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026
प्रत्युत्तरात विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीला गळती लागली. यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर आणि डोनोव्हन फरेरा यांसारखे स्टार फलंदाज फ्लॉप ठरले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने १६ चेंडूंत ३६ धावांची झुंजार खेळी केली, तर ध्रुव जुरेलने २४ आणि रवींद्र जडेजाने ३८ धावांचे योगदान दिले. मात्र, गुजरातच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर कोणाचाही निभाव लागला नाही आणि १६.३ षटकांत १५२ धावांवर राजस्थानचा गाशा गुंडाळला गेला.
राशिद खानच्या फिरकीची जादू –
The opponents have little chance when he gets going 👊
Rashid Khan is the Player of the Match for his spell of 4/33 🏅
WATCH HIS SPELL ▶️ https://t.co/APDwc80FSm#TATAIPL | #KhelBindaas | #RRvGT | @rashidkhan_19 pic.twitter.com/5MMJBQMRMC
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026
गुजरातसाठी राशिद खानने सर्वाधिक ४ विकेट्स घेत राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला जेसन होल्डर (३ बळी), कागिसो रबाडा (२ बळी) आणि मोहम्मद सिराज (१ बळी) यांनी मोलाची साथ दिली. राजस्थानकडून ब्रिजेश शर्माने २ विकेट्स घेतले, तर रवींद्र जडेजा आणि यश राज पुंजा यांना प्रत्येकी १ विकेट्स घेतली. या विजयामुळे गुजरात टायटन्सने प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.





