Indian ODI Squad : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! गिल-अय्यरचे कमबॅक, शतक झळकावणाऱ्याला डच्चू

Indian ODI Squad Announce for ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय निवड समितीने टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापतीमुळे बाहेर असलेल्या शुबमन गिलने संघात पुनरागमन केले असून, तोच या मालिकेचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर उपकर्णधार श्रेयस अय्यरचेही बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
कर्णधार शुबमन गिलचे दमदार पुनरागमन –
नियमित कर्णधार शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत के.एल. राहुलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. मात्र, आता शुबमन पूर्णपणे फिट झाला असून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
अय्यरच्या फिटनेसवर टांगती तलवार –
🚨 News 🚨
India’s squad for @IDFCFIRSTBank ODI series against New Zealand announced.
Details ▶️ https://t.co/Qpn22XBAPq#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/8Qp2WXPS5P
— BCCI (@BCCI) January 3, 2026
या संघात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, श्रेयस अय्यरची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. त्याला अद्याप बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’कडून (CoE) फिटनेस सर्टिफिकेट मिळालेले नाही. तरीही, मालिका सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्याला या मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
हेही वाचा – Hardik Pandya Century : ६,६,६,६,६…हार्दिकचा सुपरहिट शो! एकाच षटकात तब्बल इतक्या धावा कुटत झळकावलं शतक
ऋतुराज गायकवाडला डच्चू –
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे ऋतुराजला गायकवाडला वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या खेळाडूने उल्लेखनीय फलंदाजी केली होती. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले. गायकवाड दुर्दैवी ठरला. कारण शतकी खेळी केल्यानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले. टीम इंडियाने संघात तीन अष्टपैलू, चार जलद गोलंदाज, दोन यष्टीरक्षक आणि सहा फलंदाजांचा समावेश केला आहे.
रोहित-विराट फॉर्मात; चाहत्यांच्या नजरा दिग्गजांवर
भारतीय संघाचे दोन मोठे आधारस्तंभ रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत आपले कौशल्य दाखवण्यास सज्ज आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने सलग दोन शतके झळकावत ३०२ धावा कुटल्या होत्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दुसरीकडे रोहित शर्मानेही दोन अर्धशतके झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला आहे. या दोघांकडून न्यूझीलंडविरुद्धही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होईल.
हेही वाचा – Mustafizur Rahman Release : मोठी बातमी! BCCI च्या आदेशानंतर मुस्तफिजुर रहमानला KKR मधून डच्चू
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जैस्वाल





