Hardik Pandya Century : ६,६,६,६,६…हार्दिकचा सुपरहिट शो! एकाच षटकात तब्बल इतक्या धावा कुटत झळकावलं शतक

Hardik Pandya Century in Vijay Hazare Trophy : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने मैदानात आग ओकली आहे. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या हार्दिकने विदर्भ संघाविरुद्ध खेळताना केवळ शतकच झळकावले नाही, तर एकाच षटकात पाच षटकार मारून प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याच्या या वादळी खेळीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एकाच षटकात कुटल्या ३४ धावा!
विदर्भचा गोलंदाज पार्थ रेखाडे याच्या एका षटकात हार्दिक पंड्या पूर्णपणे हावी झाला. हार्दिकने या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर सलग पाच उत्तुंग षटकार ठोकले. सहाव्या चेंडूवरही षटकार मारून ‘सहा चेंडूत सहा षटकार’ मारण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे होती, मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला चौकारावर समाधान मानावे लागले. अशाप्रकारे त्याने एकाच षटकात तब्बल ३४ धावा वसूल केल्या. बीसीसीआय डोमेस्टिकने या फटकेबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला असून क्रिकेटवर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣,4⃣ 🔥
A maiden List A 💯 brought up in some style 🔥
Hardik Pandya was on 66 off 62 balls against Vidarbha…and then he went berserk in the 39th over to complete his 100, smashing five sixes and a four 💪
Scorecard ▶️ https://t.co/MFFOqaBuhP#VijayHazareTrophy… pic.twitter.com/pQwvwnI7lb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2026
७१ वर ५ बाद असताना मैदानात एन्ट्री –
बडोदा संघाची अवस्था एका वेळी २०व्या षटकात ५ बाद ७१ अशी बिकट झाली होती. सलामीवीर आणि मधली फळी स्वस्तात बाद झाल्यानंतर हार्दिक मैदानात उतरला. त्याने आपला भाऊ कृणाल पांड्यासोबत ६५ धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. हार्दिकने अवघ्या ६८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने एकूण ९२ चेंडूत १३३ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ८ चौकार आणि ११ गगनभेदी षटकारांचा समावेश होता.
हेही वाचा – Mustafizur Rahman Release : मोठी बातमी! BCCI च्या आदेशानंतर मुस्तफिजुर रहमानला KKR मधून डच्चू
बडोदाची आव्हानात्मक धावसंख्या
हार्दिकच्या या शतकी खेळीमुळे बडोदा संघाने ५० षटकांत ९ बाद २९३ धावांपर्यंत मजल मारली आणि विदर्भसमोर २९४ धावांचे लक्ष्य ठेवले. मधल्या फळीत जितेश शर्मा (९) आणि कृणाल पंड्या (२३) मोठी खेळी करू शकले नाहीत, मात्र हार्दिकच्या वादळामुळे बडोदाला मोठी धावसंख्या उभारता आली.
निवड समितीचे वेधले लक्ष –
काही काळ दुखापतीमुळे संघाबाहेर राहिलेल्या हार्दिकने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला फॉर्म सिद्ध केला होता. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा प्रकारची खेळी करून त्याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर महत्त्वाच्या मालिकांसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.





