IND vs ENG 2nd Test Shubman Gill Century : इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलची बॅट आग ओकत आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकणाऱ्या शुबमन गिलने दुसऱ्या डावातही आपला तोच फॉर्म कायम राखत सलग शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक आहे. या शतकीय खेळीच्या जोरावर त्यांनी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
विशेष म्हणजे, 54 वर्षांनंतर प्रथमच एका भारतीय खेळाडूने एका कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावले आहे. यापूर्वी 1971 मध्ये सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध एका कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले होते. गिल आता एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनलाआहे. येथेही त्यांनी सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे.
शुबमन गिलने मोडला सुनील गावस्करांचा मोठा विक्रम –
Tea Break on Day 4 of the 2nd #ENGvIND Test!#TeamIndia move 304/4 & lead England by 484 runs! 💪
Third & final session of the Day to begin 🔜
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF pic.twitter.com/xFUeIcrz8s
— BCCI (@BCCI) July 5, 2025
या शतकीय खेळीदरम्यान शुबमन गिलने अनेक विक्रम मोडले आहेत. ते आता एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एका कसोटी सामन्यात 344 धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव आहे. लक्ष्मण यांनी 2001 मध्ये कोलकात्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 340 धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजचा ऐतिहासिक षटकार! मोडला कपिल देव यांचा ४६ वर्षांचा विक्रम
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू –
Most runs for India in a Men’s Test Match 🫡
5⃣0⃣0⃣ runs and counting in the series 👏
Captain Shubman Gill at his best 🙌
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/jRF9l6cF4z
— BCCI (@BCCI) July 5, 2025
- 369* – शुबमन गिल वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, 2025
- 344 – सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, 1971
- 340 – व्हीव्हीएस लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001
- 330 – सौरव गांगुली वि. पाकिस्तान, बेंगळुरू, 2007
- 319 – वीरेंद्र सहवाग वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई, 2008
याशिवाय, भारतीय कर्णधार म्हणून एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा विक्रमही गिलच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका कसोटी सामन्यात 293 धावा केल्या होत्या.
हेही वाचा – Wimbledon 2025 : अल्काराझ, नोरी आणि सबालेंकाची विजयी घौडदौड कायम; चौथ्या फेरीत फेरीत दाखल
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार –
- 369* – शुबमन गिल वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, 2025*
- 293 – विराट कोहली वि. श्रीलंका, दिल्ली, 2017
- 289 – सुनील गावसकर वि. वेस्ट इंडिज, कोलकाता, 1978
- 278 – सुनील गावसकर वि. वेस्ट इंडिज, मुंबई, 1978
- 256 – विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड, 2014
हेही वाचा –IND vs ENG : बॅट हवेत उडाली, तरीही ऋषभ पंतने षटकार मारून रचला नवा इतिहास
एजबॅस्टन कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर शुबमन गिल यांच्या या शानदार शतकीय खेळीमुळे भारतीय संघ सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. संघाने आतापर्यंत 4 गडी गमावून 303 धावा केल्या आहेत. भारताकडून गिल आणि रवींद्र जडेजा खेळपट्टीवर उपस्थित आहेत. आता या कसोटी सामन्यात भारतीय संघ इंग्लंडसमोर किती मोठे लक्ष्य ठेवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.