Mohammad Siraj Breaks Kapil Dev’s Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीमुळे चाहते आश्चर्यचकित झाले होते. कर्णधार शुबमन गिलने सांगितले होते की, बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न हा होता की त्यांची कमतरता कोण भरून काढेल. सर्वांना वरिष्ठ गोलंदाज मोहम्मद सिराजकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सिराजने या अपेक्षांना पूर्णपणे न्याय दिला. त्यांनी पहिल्या डावात ६ विकेट्स घेऊन इतिहास रचला. त्याचबरोबर कपिल देव यांचा विक्रमही मोडला.
मोहम्मद सिराजच्या या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली .उजव्या हाताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ६ विकेट्स घेऊन केवळ भारतीय संघाची शानदार पुनरागमनच केले नाही, तर या मैदानावरील माजी कर्णधार कपिल देव यांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. आता एजबेस्टनच्या मैदानावर सर्वोत्तम गोलंदाजीच्या कामगिरीच्या बाबतीत सिराजने कपिल देव यांना मागे टाकले आहे.
कपिल देव यांनी किती बळी घेतले होते?
Leading the India charge, Mohammed Siraj excelled with the ball to give his side a handy lead 🔥#WTC27 | #ENGvIND pic.twitter.com/L9Ps4vDjNX
— ICC (@ICC) July 5, 2025
या ऐतिहासिक मैदानावर कपिल देव यांनी ४६ वर्षांपूर्वी, जुलै १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात ४८ षटके टाकली होती. त्यात त्यांनी १४६ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, सिराज यांनी १९.३ षटकांत ७० धावांत ६ विकेट्स घेऊन कपिल देव यांना मागे टाकलो. तसेच, सिराजने ईशांत शर्माला ही मागे टाकले, ज्यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात १३ षटकांत ५१ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम चेतन शर्मांच्या नावावर –
एजबॅस्टन येथे सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम माजी गोलंदाज चेतन शर्मा यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८६ मध्ये ५८ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. १९८६ नंतर एजबॅस्टनवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आता मोहम्मद सिराज यांच्या नावावर आहे. विशेष बाब म्हणजे, १९९३ नंतर या मैदानावर प्रथमच एखाद्या पाहुण्या जलदगती गोलंदाजाने एका डावात ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे, तो गोलंदाज फक्त सिराजच आहे.
एजबॅस्टन येथे सर्वोत्तम गोलंदाजी करणारे भारतीय गोलंदाज
१. चेतन शर्मा – (६/५८) १९८६
२. मोहम्मद सिराज – (६/७०) २०२५
३. इशांत शर्मा – (५/५१) २०१८
४. कपिल देव – (५/१४६) १९७९