शुक्रवारी रात्री खेळल्या गेलेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित स्पॅनिश खेळाडू अल्काराझने 12 पैकी 5 ब्रेक पॉइंट्सचा फायदा घेत 6-1, 3-6, 6-3, 6-4 अशा स्कोअरने विजय मिळवला. अल्काराझने उत्कृष्ट कामगिरी करत 55 पैकी 34 गुण जिंकले, जे त्याच्या विजयाचे मुख्य कारण ठरले.सामन्यानंतर कार्लोस अल्काराझ म्हणाला, “मला वाटते की, मी खूप चांगले रिटर्न खेळलो. यामुळे त्याच्या सर्व्हिसवर खूप दबाव आला. त्यामुळे माझ्या मते, आज हे महत्त्वाचे होते.”
Shining on Centre ✨#Wimbledon | @carlosalcaraz pic.twitter.com/g5i4Il0FBG
— Wimbledon (@Wimbledon) July 4, 2025
रशियाच्या रुबलेव्हाची विजयानंतर प्रतिक्रिया –
अल्काराझचा पुढील सामना 14व्या मानांकित आंद्रेई रुबलेव्हशी होईल. रशियाच्या रुबलेव्हने एड्रियन मॅनारिनोला 7-5, 6-2, 6-3 अशा स्कोअरने पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. सामन्यानंतर रुबलेव्ह म्हणाला, “तो खरोखरच एक ताकदवान खेळाडू आहे. मला वाटते की तो गवतावर खूप चांगला खेळतो. कारण त्याला नेहमी आक्रमक खेळायला आवडते.”
हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजचा ऐतिहासिक षटकार! मोडला कपिल देव यांचा ४६ वर्षांचा विक्रम
दरम्यान, पाचव्या मानांकित अमेरिकन टेलर फ्रिट्झने स्पेनच्या अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाला 6-4, 6-3, 6-7 (5), 6-1 अशा स्कोअरने पराभव केला. पुढील फेरीत फ्रिट्झचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनशी होईल. थॉम्पसनने तिसऱ्या फेरीत इटलीच्या लुसियानो डार्डेरीला 6-4, 6-4, 3-6, 6-3 अशा स्कोअरने हरवले.
एम्माने खूपच उत्कृष्ट टेनिस खेळले – आर्यना सबालेंका
You just can’t take your eyes off this battle 🤩#Wimbledon pic.twitter.com/xe0GaiUYqQ
— Wimbledon (@Wimbledon) July 4, 2025
महिलांच्या ड्रॉमध्ये अव्वल मानांकित आर्यना सबालेंकाने ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूचा 7-6 (6), 6-4 अशा स्कोअरने पराभव केला. सामन्यानंतर सबालेंका म्हणाली, “एम्माने खूपच उत्कृष्ट टेनिस खेळले. कारण हा सामना जिंकण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. प्रत्येक गुणासाठी मला संघर्ष करावा लागला.”