IND vs ENG 2nd Test Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या रोमांचक वळणावर आहे. भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे आणि त्यांच्याकडे मोठी आघाडी आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केएल राहुल आणि करुण नायर यांनी केली. त्यानंतर शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांचा जलवा पाहायला मिळाला. या दरम्यान ५८ चेंडू ६८ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने ३ षटकार ठोकत नवा इतिहास रचला आहे.
ऋषभ पंतने षटकारांसह रचला इतिहास –
ऋषभ पंत नेहमीच आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो कोणत्याही चेंडूला हवेत सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची क्षमता बाळगतो. चौथ्या दिवशी पंतने आपल्या खेळीच्या सुरुवातीला एक दमदार षटकार ठोकला. जोश टंगच्या चेंडूवर पंतने पुढे येऊन समोरच्या दिशेने जबरदस्त षटकार लगावला. विशेष म्हणजे, षटकारांच्या बाबतीत पंतने इतिहास रचला आहे.
Most SIXES for a visiting batter in a country in Tests ⬇️
23* – Rishabh Pant in England
21 – Ben Stokes in South Africa
19 – Matthew Hayden in India
16 – Harry Brook in New Zealand
16 – Vivian Richards in England— Cricket.com (@weRcricket) July 5, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच देशात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये पंतने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने इंग्लंडमध्ये एकूण २३ षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत २१ षटकार लगावले आहेत.
हेही वाचा – Wimbledon 2025 : अल्काराझ, नोरी आणि सबालेंकाची विजयी घौडदौड कायम; चौथ्या फेरीत फेरीत दाखल
ऋषभ पंतची बॅट उडाली हवेत –
Classic Rishabh Pant 🤣
(via @englandcricket) #ENGvIND pic.twitter.com/ynZoP2gOOH
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 5, 2025
जेव्हा जेव्हा ऋषभ पंत फलंदाजीला येतो, तेव्हा चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होते. त्याची शॉट खेळताना बॅट सुटण्याची सवय नेहमीच राहिली आहे. तो अनेकदा ही चूक करतो आणि असेच काहीसे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावातही घडले. पंतने जोश टंगच्या चेंडूवर हवेत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. चेंडू गेला नाही, पण पंतची बॅट हातातून निसटून हवेत उडाली. हे पाहून समालोचक, मैदानावरील प्रेक्षक आणि भारतीय संघाचे खेळाडू जोरजोरात हसू लागले. सामन्याबद्दल बोलायचे तर भारताने दुसऱ्या डावात ४ बा ३०० धावा करत ४८० धावांची आघाडी घेतली आहे.