#INDvAUS 1st T20 : ‘विशाखापट्टणम’मध्ये सामन्यादरम्यान कसे असेल हवामान, पाऊस बिघडवणार का खेळ?

IND vs AUS 1st T20 Visakhapatnam Weather Forecast : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. मात्र या सामन्यात पाऊस खलनायक ठरणार का? हवामान खात्यानुसार, विशाखापट्टणममध्ये दिवसभरात तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर आर्द्रता 63 टक्के राहील. याशिवाय विशाखापट्टणममध्ये आज पावसाची शक्यता अंदाजे 60 टक्के आहे. हवामान खात्यानुसार, भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू होण्यापूर्वी हलका पाऊस पडू शकतो.
पावसामुळे सामना रद्द होईल का…?
सामन्यादरम्यान पाऊस पडणार नसल्याचे म्हटले जात आहे. पण टॉसला उशीर होऊ शकतो. पावसामुळे टॉसला विलंब होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पण या सामन्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. पण सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहू शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचवेळी, आज मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर दोन्ही संघ टी-20 मालिकेत आमनेसामने…
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अलीकडेच भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला. त्याच वेळी, भारतीय संघ तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन होण्यास मुकला. मात्र, आता दोन्ही संघ 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत आपली ताकद दाखवतील. विशाखापट्टणमनंतर तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, रायपूर आणि बंगळुरू येथे मालिकेचे सामने होणार आहेत.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने संध्यासाठी 7 पासून)
पहिला सामना – 23 नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरा सामना – 26 नोव्हेंबर, तिरुअनंतपूरम
तिसरा सामना – 28 नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथा सामना – 1 डीसेंबर, नागपूर
पाचवा सामना – 3 डीसेंबर, हैदराबाद
टीम इंडियाचेच वर्चस्व…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 26 सामन्यांमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर सरस ठरली आहे. भारतीय क्रिकेट संघाने कांगारुंचा 15 सामन्यांमध्ये पराभव केला आहे तर ऑस्ट्रेलियाला केवळ 10 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर एकमेव सामन्याचा निकाल लागू शकला नाही.





