Rain Latest Upates: महाराष्ट्रातील अनेक भागात आजही धो-धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
Rain Latest Upates : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Rain Latest Upates: राज्यातील अनेक भागात सध्या दमदार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क (Rain Latest Upates)
रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस खबरदारीचे आहेत. रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना आज गुरुवारी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी गुरुवारी याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केले.
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, पोलादपूर या तालुक्यांमधील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्था बंद राहतील.
शाळा, महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्टी घोषित (Rain Latest Upates)
दुसरीकडे, पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आजही हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सध्याही जिल्ह्यात पावसाची सुरू असून आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी शाळा, महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्टी घोषित केले आहे. आज पालघरला रेड अलर्ट असल्याने आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अस आवाहनही नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
अलर्ट जारी (Rain Latest Upates)
दरम्यान, पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. तर मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा :






