बॉलीवूड अभिनेत्री तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट ‘द क्रू’चा प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज झाला. खलनायक चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे आयकॉनिक गाणे या व्हिडिओमध्ये वापरण्यात आले. या टीझरने चाहत्यांमध्ये उत्सुकता तर वाढवलीच, पण या गाण्याच्या आठवणीही ताज्या केल्या आहे. हे गाणे अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायले आहे.
गाण्याचा योग्य वापर केला नाही
‘द क्रू’ या ताज्या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये वापरण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ईला म्हणाल्या, ‘मला हा प्रोमो फारच फालतू वाटला. हा प्रोमो कोणी बनवला आहे, अर्थातच या गाण्याशी चित्रपटाचा काहीही संबंध नाही पण मला खूप वाईट वाटत आहे. सीट बेल्ट बांधणे आणि ब्लाउज घट्ट करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.
निर्मात्यांनी कोणत्या अर्थाने विचार केला आहे आणि त्याचा कसा संबंध जोडायचा आहे? या गाण्याचा योग्य वापर केलेला नाही. गाणे अनेक प्रकारे गायले जाऊ शकते. ‘चोली घट्ट करा म्हणजे हृदय बाहेर पडणार नाही’ या ओळीचा संदर्भ काय आहे? प्रोमो ज्याने बनवला त्याला मेंदू नाही. मला त्यात सौंदर्यशास्त्रही दिसत नाही. खूप निराशाजनक. असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच या गाण्याला 30 वर्षे पूर्ण झाली हा योगायोग म्हणावा लागेल.