Ikkis Premiere: रेखाने अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टरचे घेतले चुंबन; ‘इक्कीस’च्या प्रीमियरमधील व्हिडीओ व्हायरल

Ikkis Premiere : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा पुन्हा एकदा तिच्या खास आणि प्रेमळ अंदाजामुळे चर्चेत आली आहे. निमित्त होतं अगस्त्य नंदा (अमिताभ बच्चन यांचा नातू) आणि सिमर भाटिया यांचा पहिला चित्रपट ‘इक्कीस’च्या प्रीमियरचं.
हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, मुंबईत झालेल्या प्रीमियरला रेखाने हजेरी लावली. या कार्यक्रमात तिचा एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रेखाची खास एंट्री
नेहमीप्रमाणेच रेखा हिरवी आणि सोनेरी साडी नेसून अतिशय ग्रेसफुल अंदाजात कार्यक्रमात पोहोचली. सर्वप्रथम तिने या चित्रपटातील दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टरला हात जोडून आदरांजली वाहिली.
यानंतर रेखा थेट अगस्त्य नंदा यांच्या पोस्टरकडे गेली. तिने पोस्टरला प्रेमाने किस केलं आणि अगस्त्यला आशीर्वाद दिला. हा क्षण पाहून उपस्थित सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अमिताभ बच्चन यांच्या नातवावर रेखाने दाखवलेलं हे प्रेम चाहत्यांना खूपच भावलं. रेखा आणि अगस्त्यचा हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
रेखा-अमिताभ यांचा जुना इतिहास
एकेकाळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होती. मात्र दोघांनीही आपापले मार्ग शांतपणे वेगळे केले. अशा परिस्थितीत रेखाने अमिताभ यांच्या नातवावर प्रेमाचा वर्षाव केल्याने चाहत्यांना हा क्षण आणखी खास वाटला.
‘इक्कीस’ चित्रपटाबद्दल
‘इक्कीस’ हा एक वॉर ड्रामा चित्रपट असून, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शूरवीर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं असून, निर्मिती दिनेश विजान यांची आहे.
हा चित्रपट अगस्त्य नंदा याचा पहिला थिएटर रिलीज आहे. याआधी तो नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’ चित्रपटात दिसला होता.





