“डोळ्यांवर चष्मा हातात बॅग…”; रेखाच्या हटके लूकवर चाहते झाले फिदा! व्हिडीओ पाहा…

Rekha video : बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखाला ओळखले जाते. वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पणातही रेखा विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असते. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यांचे देखील नेहमी कौतुक होते. अनेकदा चाहत्यांनी तिला साडीतल्या लूकमध्येच पाहिले आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत अभिनेत्रीचा हटके लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या हटके लूकची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या लूकने अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
रेखा अभिनेत्री हेलन यांच्या 87 व्या बर्थडे पार्टीमध्ये सहभागी झाली होती. मुंबईत झालेल्या या ग्रँड पार्टीमध्ये बाॅलीवूड इंडस्ट्रीतील अनेक तारे उवतरले होते. या बर्थ डे पार्टीला रेखा खास लूकमध्ये आली होती. त्यांनी ब्लॅक कलरचा जम सूट आणि त्यावर ब्लू डेनिम जॅकेट वेअर केले होते. हातात झोला वाली बॅग, डोळ्यांवर गॉगल आणि तिची नेहमीच मरून कलरची लिप्स्टिक. अशा हटके लूकने तिने उपस्थित असणाऱ्या सर्वांचीच मनं जिंकली. यावेळी रेखाने पापाराझींना पोजही दिल्या.
View this post on Instagram
रेखाचा हा डॅशिंग अंदाज पाहून युझरर्सने कमेंट्स केल्या आहेत. क्विन नेहमीच पॉझिटिव्ह असते. त्यांच्या मागे उभे असलेले गार्ड देखील त्यांना पाहून खुश आहेत, असे एका नेटकऱ्यांने म्हटले आहे. दुसऱ्याने लिहिलंय, सुपर एनर्जेटिक. आणखी एका युझरने लिहिलंय, तुम्हाला पाहून अमिताभ यांना जेलस होत असतील. अशा खूप साऱ्या कमेंट्स नेटकरी आणि रेखा यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
गुस्ताख इश्क या चित्रपटातून रेखा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर तब्बल ११ वर्षांनी कमबॅक करणार आहेत. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून, या चित्रपटात त्यांचा कॅमिओ पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.





