वय फक्त एक आकडा! अभिनेत्री रेखा यांचा दिलखेच अंदाज; डान्स व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Rekha Dance Video | बॉलिवूड इंडस्ट्रीची सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्या पुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. ७१ वर्षांच्या वयातही रेखा यांच्या स्टाइलचे लोक खूप दीवाने आहेत. सध्या रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि सुंदर लुकची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
परफॉर्मन्सदरम्यान रेखा यांचा हा लूक आणि डान्स लोकांना अभिनेत्री मधुबाला यांची आठवण करून देत आहे. यावेळी रेखा यांनी हेवी लेहंगा आणि दागिने घातलेले आहेत व्हिडीओमध्ये रेखा ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटातील ‘मोहे पनघट पे’ गाण्यावर डान्स करत आहेत. या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. Rekha Dance Video |
View this post on Instagram
नेटकऱ्यांकडून कौतुक
रेखा यांच्या या डान्सचे कौतुक करत व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘वाह रेखाजी किती दिलखेच अंदाज आहे’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात देखील इतका सुंदर डान्स’ तर आणखी एकाने लिहिले की, ‘वयाच्या 71 व्या वर्षात 17 वर्षांच्या दिसत आहेत.’ या वयातही त्यांची एनर्जी आणि सौंदर्य पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, रेखा यांना शेवटचे २०१४ मध्ये आलेल्या ‘सुपर नानी’ चित्रपटात पाहिले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, रेखा यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. चित्रपटा व्यतिरिक्त रेखा यांना अनेक टीव्ही शोज आणि कार्यक्रमांमध्ये पाहिले गेले आहे. Rekha Dance Video |
हेही वाचा:
महसूल विभागाचा प्रताप! मृत व्यक्तीच्या नावाने पाठवली नोटीस, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी





