Kiara Advani : बॅालीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, हा चित्रपट १९ मार्च २०२६ मध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे. केजीएफ फेम अभिनेता यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्याचा जबदस्त लूक आणि चित्रपटाचा टीझर अगोदर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता अभिनेत्री कियारा अडवाणीचा दमदार लूक रिव्हील करण्यात आला आहे. अभिनेता यशने इंस्टाग्रामवर कियारा अडवाणीचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत ती रॅम्पवर चालताना दिसत आहे. लक्ष वेधून घेणारा गाऊन तिने वेअर केला आहे. पोस्टर शेअर करत यशने “टॉक्सिक – अ फेयरी टेल फॉर ग्रोन्स-अप्समध्ये नादियाच्या भूमिकेत कियारा अडवाणी.” असे कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट शेअर करून अभिनेत्याने कियाराचा चित्रपटामध्ये असलेल्या पात्राचे नाव काय आहे. याबाबत सांगितले आहे. View this post on Instagram A post shared by Yash (@thenameisyash) यश, नयनतारा आणि कियारा अडवाणी हे तिघेही ‘टॉक्सिक’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. सोशल मीडियावर कियाराच्या लूकला चाहत्यांनी पसंती दर्शवली असून चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक युजर्संनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहे.” असे म्हटले आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने, “क्रेझी बॉस आणि नादिया.” आणखी एका वापरकर्त्यांने, “भारताचा सर्वात मोठा चित्रपट.” अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता यश याला केजीएफ चित्रपटाने मोठी प्रसिद्ध मिळवून दिली. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वलही आला. त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता यश टॅाक्सिक या बहुप्रतिक्षित चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आणि यशचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हेही वाचा : मालवणमध्ये शिवसेनेच्या निलेश राणेंनी उधळला गुलाल; बंधु नितेश राणेंना धक्का