नवी दिल्ली : महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा त्याच्या आगामी इक्क्कीस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे, अशातच अगस्त्यचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा अगस्त्य नंदाला मिठी मारताना दिसत आहेत. या भावनिक क्षणाने चाहते भारावून गेले आहेत. हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या आरके फिल्म फेस्टिव्हलमधील आहे, या कार्यक्रमाला अनेक प्रमुख बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. व्हायरल व्हिडिओमध्ये रेखा अगस्त्य नंदाला प्रेमाने मिठी मारताना त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरून त्यांची प्रशंसा करताना दिसत आहे. अगस्त्य देखील रेखाला हात जोडून आदराने अभिवादन करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दल खूप चर्चा रंगत त्याकाळी बॅालीवूडमध्ये रंगत असायच्या. “सिलसिला,” “अलाप,” “नमक हराम,” “दो अंजाने,” आणि “गंगा की सौगंध” यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांची जोडी चांगलीच गाजली. रेखाला अमिताभ यांच्या नातवाबद्दल असलेले प्रेम लोकांना भावले आहे. ‘इक्किस’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अगस्त्य नंदा या चित्रपटात भारतीय लष्करातील शूर सैनिक अरुण खेतरपालची भूमिका साकारत आहेत. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अरुण खेतरपाल शहीद झाले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण सैनिकांपैकी ते एक होते. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी मुंबईत चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पाहिले आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये अगस्त्यचे कौतुक केले. बिग बी यांनी लिहिले की, अगस्त्यच्या अभिनयातून परिपक्वता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो आणि तो प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांना मोहित करतो. दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्स बॅनरखाली निर्मित करण्यात आली आहे. तर श्रीराम राघवन यांनी इक्क्कीस चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अगस्त्य नंदा २०२३ मध्ये झोया अख्तरच्या “द आर्चीज” वेबसिरीजमध्ये दिसला होता. आता त्याच्या इक्क्कीस चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हेही वाचा : मोठी बातमी! पुण्यात ‘ठाकरें बंधूं’चा जागावाटपाचा फॅार्म्युला ठरला; लवकरच शिक्कामोर्तेब होणार