कोपरगाव – संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये जगातील मोठी व्यावसायिक संघटना अशी ओळख असलेल्या इन्स्टिटयूट ऑफ इलक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) पुरस्कृत राज्यातील सहा विभागांचे टेक्नोवेशन 23 या तांत्रिक प्रदर्शनाच्या स्पर्धा नुकत्याच झाल्या. संजीवनीच्या वतीने दरवर्षी प्रोजेक्ट विजेत्यांना 25 हजाराची बक्षीसे जाहीर केली आहे. यावेळी विजेत्यांना त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ 25 हजारांची रोख बक्षीसे देण्यात आली.
आयईईईचे चेअरमन आनंद घारपुरे यांच्या अध्यक्षतेखाली व आयईईईचे स्टुडंटस ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रा.दत्तात्रय सावंत, टाटा इन्स्टिट्यूट्स ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेचे सिनिअर सायंटिस्ट डॉ. बी. सत्यनारायणा, इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. आगरकर, आयईईईच्या प्रतिनिधी साक्षी नेहे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. घारपुरे व प्रा. सावंत यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल संजीवनीचा गौरव केला.
अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातुर आणि नांदेड या जिल्ह्यातील इंजिनिअरींग कॉलेजचे 80 प्रोजेक्टसचा समावेश होता. यातुन 4 बेस्ट प्रोजेक्टस् निवडण्यात आले. अंतिम सादरीकरणात थाडोमल शहानी इंजिनिअरींग कॉलेज, बांद्रा, मुंबईने प्रथम विजेते पद मिळविले. गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, जळगाव व सिंबॉयसिस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे या संस्थांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
विद्यालंकार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडाळा, मुंबई या संस्थेला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी राज्यस्तरीय स्पर्धांचे अतिशय शिस्तबध्द आयोजन केल्याबद्दल संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी बक्षीस वितरण केले.