महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी माफी मागणारच नाही’, भाजप आमदारांची भूमिका

पुणे : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असतानाच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण सुरु झाला आहे. मात्र यावर सुनील कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

व्हायरल झालेली ती ऑडिओ क्लिप माझी नाहीच, त्यात असणारा आवाज सुद्धा माझा नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असं स्पष्टीकरत भाजपचे आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी दिलं आहे.आमदार कांबळे यांनी एका महिला अधिकाऱ्याला फोन केला होता. त्यावेळी शिवीगाळ करत असल्याची ऑडीओ क्लिप आज व्हायरल झाली होती.

दरम्यान ‘जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे ती माझी नाही. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जात आहे. त्यात असणारा माझा आवाज नाही. हे विरोधकांचं षडयंत्र आहे, असं सुनील कांबळे यांनी म्हटलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.