“माझा मानसिक आणि शारीरिक छळ झाला”; मयुरी वाघचा घटस्फोटानंतर मोठा खुलासा

Mayuri Wagh | अभिनेत्री मयुरी वाघला ‘अस्मिता’ मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या सेटवरच मयुरी आणि पियुष रानडे यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नानंतर दोन वर्षांतच मयुरी आणि पियुष यांचा घटस्फोट झाला. अनेक वर्षानंतर तिने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला. तिचा मानसिक आणि शारिरीक छळ झाल्याचे तिने म्हंटले आहे.
मयुरीने मुलाखतीत सांगितले की, “मी लग्नाचा निर्णय खूपच पटकन घेतला. आताची जनरेशन मी बघतेय की लोक खूप विचार करून लग्न करतात. जे मी नाही केलं. मी बघितलंय की मुलींचही ठरलेलं असतं की एवढा पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर पाहिजे किंवा त्याच्या कुटुंबात या गोष्टी हव्यात. या बाबतीत मुलं किंवा मुली दोघांचेही विचार ठरलेले आहेत. माझं तसं नाही झालं. मी खूप घाई गडबडीत निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. पण सहा महिन्यांतच कळलं की निर्णय चुकला आणि ते मला स्वीकारायला खूप वेळ गेला.” Mayuri Wagh |
“माझ्या आईला सकाळी 10 वाजेपर्यंत फोन केला नाही तर ती घाबरायची. ती मला विचारायची भांडण झालं आहे का, तू ठिक आहेस ना आणि एक क्षण आला जेव्हा मला हे सर्व थांबलं पाहिजे असं वाटलं. समोरच्या व्यक्तीने माझ्या वडिलांनी काही अपशब्द बोलले. ते मला बिलकूल आवडलं नाहीत. कारण जोपर्यंत माझ्यापर्यंत होतं, तोपर्यंत ठिक होतं. आई -वडिलांना कोणी बोलेल मला सहन होणार नाही.” Mayuri Wagh |
मुलींना शिकवलं जातं की सहन करावं लागतं, पण…
पुढे मयुरी म्हणाली, “ज्याच्यावर मी १०० टक्के विश्वास ठेवलाय, काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या त्याकडे मी दुर्लक्ष केलं. पण त्या व्यक्तीकडून विश्वासघात झाला. आपल्याकडे मुलींना शिकवलं जातं की सहन करावं लागतं. लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. पण, कधीपर्यंत हे सहन करायचं हे देखील आपण शिकवलं पाहिजे. मी त्याच्या सेटवर सरप्राइज द्यायला जायचे आणि तो तिथे नसायचा. कुठे जायचा माहीत नाही, फोन उचलायचा नाही आणि खूप रँडम स्टोरी मग ऐकायला मिळायची. गाडी पंक्चर झाली वगैरे, ज्यावर तुम्ही विश्वासही ठेवणार नाही.” शारीरिक छळ झाल्याचा खुलासाही मयुरीने मुलाखतीत केला. Mayuri Wagh |
“जेव्हा मी ती फुलराणी शूट करत होते. तेव्हा तिथले सहकलाकार होते त्यांना माहीत होतं की हिच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. जे ती शेअर करू शकत नाही. पण ते माझ्यासोबत असायचे. पर्सनल आयुष्यात मी डिर्स्टब आहे हे त्यांना कळत होतं. सकाळी ८ वाजता सेटवर आल्यावर शूटिंग संपून जरी पॅकअप झालं असलं तरी ते माझ्याबरोबर असायचे. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवलाय ती व्यक्ती हे करूच शकत नाही. हे मला समजायला, स्वीकारायला खूप वेळ गेला. आणि त्यातून बाहेर येण्यासाठी निर्णय घ्यायलाही खूप वेळ गेला. पुढे जावं की थांबावं की आहे तसं सोडून द्यावं हे माझं मलाच कळत नव्हतं,” असं मयुरीने सांगितलं.
हेही वाचा:





