Jahnavi Killekar | ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अबोली’ मालिकेत दोन अभिनेत्रींची एन्ट्री होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जान्हवी एका पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारणार आहे.
तिच्या व्यक्तिरेखेचं नाव दीपशिखा भोसले असं आहे. जान्हवीसह या मालिकेत अभिनेत्री मयुरी वाघची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी मयुरीने ‘अस्मिता’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘लव्ह लग्न लोचा’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये, इन्स्पेक्टर दीपशिखा चौकशी करताना संशयिताला पट्ट्याने मारत असते. इतक्यात अबोली येऊन दीपशिखाला अडवते आणि “अंकुश सरांच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्याची ही पद्धत नाही” असं तिला सांगते. यावर, “ही आता अंकुशची नव्हे तर इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटीलची चौकी आहे” असं उत्तर दीपशिखा देते. Jahnavi Killekar |
View this post on Instagram
पुढे, अबोली म्हणते, “कोणाचीही चौकी असो, जो कायद्याने चालणार नाही त्याला अबोली वकिलीचा हिसका दाखवणार.” सध्या या प्रोमोला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जान्हवी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने चाहते देखील उत्सुक आहेत. जान्हवी आणि मयुरी या दोन्ही अभिनेत्री येत्या १५ जानेवारीपासून ‘अबोली’ मालिकेत झळकणार आहेत.
हेही वाचा:
पंतप्रधानांनी देशाला समर्पित केले ‘त्रिदेव’ ; मोदींच्या हस्ते नौदलात दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल