Akshay Kumar : अक्षय कुमार भोजपुरी अंदाजात; ‘घिस घिस घिस’ गाण्यामुळे ट्रोल
Akshay Kumar : अक्षय कुमारसोबत अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंह मुख्य भूमिकेत

Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षय भोजपुरी लुकमध्ये पाहायला मिळाला. यातील त्याचा अंदाज पाहून सर्वचजण आवाक झाले. यात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंह मुख्य भूमिकेत आहे.
अक्षय कुमारने हे गाणे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिले, “जर तुमचे आयुष्य थोडे जास्तच घासले जात असेल, तर आता वेळ आली आहे ‘घिस घिस’ गाण्यासोबत स्वतःची वाइब बदलण्याची.” या गाण्यावर सोशल मीडिया युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
Child Diet: मुलांना भूक लागत नाही? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर
या गाण्यात अक्षयने एका भोजपुरी अभिनेत्यासारखा गेटअप केला आहे. तो धोती-कुर्ता घालून अक्षरासोबत जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युझरने लिहिले, “भोजपुरी इंडस्ट्रीत कोणताही अभिनेता असा दिसत नाही,” दुसऱ्या युझरने लिहिले, “अक्षयने या गाण्यावर फक्त डान्स केला असता तर तो जास्त चांगला दिसला असता.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिले, “हे काय पाहावे लागत आहे?” त्यामुळे काहींनी त्याला सोशल मिडियावर ट्रोलही केले आहे.
हा चित्रपट २६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात अक्षयसोबत सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘वेलकम टू द जंगल’ ही एक लोकप्रिय फ्रँचायझी आहे, जिचे दोन्ही भाग प्रेक्षकांना खूप आवडले होते. दरम्यान, अक्षयचा ‘भूत बंगला’ हा चित्रपटही नुकताच रिलीज झाला होता.
हेही वाचा:






