Box Office Collection : ‘देऊळ बंद 2’चा बॅाक्स अॅाफिसवर दबदबा! पाच दिवसांच्या कमाईचे आकडे पाहा
Box Office Collection : ज्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला आहे. त्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावरुन पोस्ट लिहित कौतक केलं आहे.

Box Office Collection : प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2 ) या मराठी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता ही उत्सुकता बॉक्स ऑफिसवरील कमाईतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
२१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत ३ कोटी ५ लाखांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३ कोटी ११ लाख, तिसऱ्या दिवशी ५ कोटी २१ लाख आणि चौथ्या दिवशी तब्बल ५ कोटी ९० लाखांचा गल्ला जमवत चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत १७ कोटी ४७ लाखांची कमाई केली आहे. (Box Office Collection)
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पाचव्या दिवशी म्हणजेच २५ मे रोजी कमाईत थोडी घट झाली असली तरी ‘देऊळ बंद २’ने ३ कोटी ४० लाखांची कमाई करत बॉक्स ऑफिसवरील पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे आतापर्यंतची चित्रपटाची एकूण कमाई २० कोटींच्या पुढे गेली आहे. ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.
या चित्रपटाने केवळ प्रेक्षकच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन विश्वातूनही कौतुक मिळवलं आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही सोशल मीडियावरून ‘देऊळ बंद २’ आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. ज्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला आहे. त्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावरुन पोस्ट लिहित कौतक केलं आहे.

Box Office Collection : ‘देऊळ बंद 2’चा बॅाक्स अॅाफिसवर दबदबा! पाच दिवसांच्या कमाईचे आकडे पाहा
या चित्रपटात स्वामींच्या भूमिकेत असलेले अभिनेते मोहन जोशी आणि शेतकरी महिलेच्या भूमिकेत असलेल्या स्नेहल तरडे यांचे विशेष कौतुक केलं जात आहे.
‘देऊळ बंद २’मध्ये प्रवीण तरडे यांच्यासोबत स्नेहल तरडे, अतुल कुदळे, रमेश परदेशी, मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ( Box Office Collection)
विशेष म्हणजे, पहिल्या भागातील राघव शास्त्रीची भूमिका साकारणारा अभिनेता गश्मीर महाजनी याने चित्रपटाच्या शेवटी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत एन्ट्री घेतली आहे. ‘देऊळ बंद ३’ची हिंट देण्यात असून प्रेक्षकांमध्ये आता तिसऱ्या भागाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा : Varun Dhawan : वरुण धवन हॉलीवूडमध्ये झळकणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता





