Drishyam 3: मोहनलालच्या ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; पाचव्या दिवशी नवा विक्रम
Drishyam 3 दृश्यम 3 हा चित्रपट दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटातील जबरदस्त कथा, रहस्य आणि मोहनलाल यांचा दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Drishyam 3: मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’ (Drishyam 3 ) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेल्या या चित्रपटाने रिलीज झाल्यापासूनच तुफान कमाई सुरू ठेवली असून, आता या चित्रपटाने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पाचव्या दिवसापर्यंत चित्रपटाची जगभरातील कमाई 150 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचली आहे.
दृश्यम 3 हा चित्रपट दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटातील जबरदस्त कथा, रहस्य आणि मोहनलाल यांचा दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
रिपोर्टनुसार, ‘दृश्यम 3’ने पाचव्या दिवशी भारतात सुमारे 7.35 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.85 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग घेतली होती. दुसऱ्या दिवशी 11.05 कोटी, तिसऱ्या दिवशी 13.70 कोटी आणि चौथ्या दिवशी एकूण कमाई 54.55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. आता पाच दिवसांत चित्रपटाची भारतातील नेट कमाई 61.80 कोटी रुपयांवर गेली आहे. (Drishyam 3)

‘Drishyam 3’
देशांतर्गत कमाईत थोडी घट दिसत असली तरी परदेशात मात्र ‘दृश्यम 3’चा दबदबा कायम आहे. ओव्हरसीज मार्केटमध्ये या चित्रपटाने पाच दिवसांत जवळपास 50 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल 156.14 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
या शानदार कमाईमुळे ‘दृश्यम 3’ने मल्याळम चित्रपटसृष्टीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 मल्याळम चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने स्थान मिळवले आहे. भारतासोबतच विदेशातही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
चित्रपटातील रहस्यपूर्ण कथा आणि उत्कंठावर्धक ट्विस्टमुळे प्रेक्षक थिएटरकडे आकर्षित होत आहेत. सोशल मीडियावरही ‘दृश्यम 3’ची जोरदार चर्चा सुरू असून अनेक चाहते चित्रपटाचे कौतुक करत आहेत. (Drishyam 3)
मोहनलाल यांच्या अभिनयासोबतच चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनालाही प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. पुढील काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठे रेकॉर्ड मोडू शकतो, अशी चर्चा चित्रपटविश्वात सुरू झाली आहे.





