Rohit Parashuram : ‘मह्या, रिप्लाय आला नाही आणि…; मित्राच्या निधनाने अभिनेता भावूक, पोस्टने डोळे पाणावले
Rohit Parashuram : या अभिनेत्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. या मालिकेत अर्जुन विनायक कदम ही भूमिका साकारणाऱ्या रोहित परशुराम याने दुःख व्यक्त केलं आहे.

Rohit Parashuram : रायगडच्या आंबेनळी घाटात चारचाकी वाहन दरीत कोसळून भीषण अपघातची घटना नुकतीच घडली. या अपघातात 8 तरुणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे साताऱ्यालह रायगडमध्ये शोककळा पसरली. या आठ जणांपैकी सात जण साताऱ्यातील होते, तर एक जण हा रत्नागिरी जिल्ह्यातील होता.
आठ जणांमध्ये एका मराठी अभिनेत्याचाही समावेश आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीने मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. आंबेनळी अपघातात जीव गमावणाऱ्या अभिनेत्याचे नाव महेश पवार आहे. ज्याने अप्पी आमची कलेक्टर या प्रसिद्ध मालिकेत काम केलं होतं. त्याची आणखी काम मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घातली.
या अभिनेत्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. या मालिकेत अर्जुन विनायक कदम ही भूमिका साकारणाऱ्या रोहित परशुराम याने दुःख व्यक्त केलं आहे. (Rohit Parashuram)
आंबेनळी घाटात महेश पवारच्या मृत्यू झाल्याची बातमी समजता रोहितने सोशल मीडियावर पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे. “आज आमच्या आसनगावसाठी काळा दिवस. गावातले 5 तरुण एका दुर्दैवी अपघातात अवेळी जग सोडून गेले. 3 वर्षे रोज तुमच्यासोबत घालवलेला एक एक क्षण डोळ्यांसमोर येतोय भावांनो. सगळं विसरून पुढे जाणं सोपं नाही.”
महेश पवारसोबत फोटो पोस्ट करत रोहितने त्याच्यासाठी खास पोस्ट केली. तो म्हणाला, “मह्या काल तुला हॅप्पी बर्थडे मेसेज केला, त्याता रिप्लाय केला नाहीस आणि आज भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट करायला लागतेय. हे चुकीचं आहे मह्या. तुझ्या घरी जेवायला यायचं राहिलं.”
अपघात झाला त्या दिवशी महेशचा वाढदिवस होता. रोहितने महेशला बर्थडे विशचा मेसेज केला होता. पण त्याचा रिप्लाय आला नाही आणि रोहितला त्याच्या निधनाचीच बातमी समजली. यानंतर त्याला मोठा धक्काच बसला. (Rohit Parashuram)
22 वर्षीय महेशसह 8 जणांचा या दुर्देवी अपघातात मृत्यू झाला आहे. आदित्य साळुंखे (वय 21), रितेश लोखंडे (21), सुहास लोखंडे (19), अंश चव्हाण (19), निखिल शिंगटे (21), संदीप काटकर (35), उत्कर्ष शिंगटे (21) अशी मृतांची नावे आहेत.
नेमकी कशी घडली घटना? (Rohit Parashuram)

Amboli Ghat Accident
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी दापोलीहून साताऱ्याकडे जात होती. पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि स्कॉर्पिओ अंदाजे 700 ते 1500 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर बराच वेळ कोणालाही या दुर्घटनेची माहिती मिळाली नव्हती. गाडीतील प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आंबेनळी घाट परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर दरीत वाहन दिसून आलं आणि दुर्घटनेचा उलगडा झाला.
हेही वाचा : Stock Market Today: शेअर बाजारात घसरण ! सेन्सेक्स २०० अंकांनी कोसळला ; निफ्टी २४००० च्या खाली





