Maa Inti Bangaaram Trailer: समंथा रुथ प्रभुचा दमदार अॅक्शन अवतार; ‘मां इंटी बंगारम’चा ट्रेलर पाहून चाहते झाले उत्साहित
Maa Inti Bangaaram Trailer ‘मां इंटी बंगारम’ हा चित्रपट सुरुवातीला १५ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Maa Inti Bangaaram Trailer: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभु हिच्या बहुप्रतीक्षित ‘मां इंटी बंगारम’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सामंथाचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. “क्वीन पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
ट्रेलरची सुरुवात एका साध्या आणि पारंपरिक कुटुंबात नवीन सून म्हणून आलेल्या महिलेपासून होते. समंथा सुरुवातीला शांत, समजूतदार आणि कुटुंबातील सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारी सून म्हणून दिसते. मात्र, पुढे कथेत मोठा ट्विस्ट येतो आणि तिच्या आयुष्यातील गुपित हळूहळू समोर येऊ लागते.
कुटुंबावर संकट आल्यावर सामंथा धाडसी आणि अॅक्शन अवतारात दिसते. ट्रेलरमध्ये तिचे फाईट सीन्स, दमदार संवाद आणि स्टायलिश अॅक्शन चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. आतापर्यंत रोमँटिक आणि भावनिक भूमिकांमध्ये दिसलेली सामंथा या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘मां इंटी बंगारम’ हा चित्रपट सुरुवातीला १५ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
समंथाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रेलर शेअर करत चाहत्यांना खास संदेश दिला. तिने पोस्टमध्ये “आता ट्रिगर दाबण्याची वेळ आली आहे” असे लिहिले. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू झाली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिनी रेड्डी यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती समंथा, राज आणि हिमांक यांनी मिळून केली आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी “सर्वात दमदार ट्रेलर”, “स्क्रीनची खरी क्वीन परतली” अशा कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी समंथाच्या अॅक्शन आणि स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
‘मां इंटी बंगारम’ ही एका अशा महिलेची कथा आहे जी एका पारंपरिक कुटुंबात सून म्हणून प्रवेश करते. मात्र, तिच्या भूतकाळात अनेक गुपिते दडलेली असतात. जेव्हा जुने शत्रू परत येतात, तेव्हा ती आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्वतःची खरी ओळख लपवत लढा देते.
ट्रेलरमधील सस्पेन्स, अॅक्शन आणि भावनिक कथा पाहता हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.





