टाकळीभान, (वार्ताहर) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व संमोहनतज्ज्ञ डाॅ. रामकृष्ण जगताप यांना नुकतेच “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चर्मकार विकास संघ, श्रीरामपूर तालुका यांच्या वतीने आयोजित केलेल्या संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती उत्सव सोहळ्यात डॉ.रामकृष्ण जगताप यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार लहू कानडे, भाजपचे प्रकाश चित्ते, माजी पोलीस अधिकारी साहित्यिक सुभाष सोनवणे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, भाऊसाहेब डोळस, संतोष देवराय आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
डॉ. रामकृष्ण जगताप यांनी पुणे विद्यापीठ येथून संमोहन विषयावर पीएच.डी.पदवी संपादन केली. तसेच’ संमोहन काळाची गरज’,’ तथास्तु’, लेखणीचे झाड’,’ पोरका बाबू’,’ साहित्यशिल्प’ ‘अंतर्मन बोले तथास्तू’ लहान मुलांना लिहिते करून त्यांनी अशा छोट्या कविंच्या चिमुकल्यांच्या कविता,’ कुक्कड वेढ्याच्या कविता’अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली असून डाॅ. मानसशास्त्र व संमोहनच्या माध्यमातून त्यांनी अनेक मनोरुग्णावर यशस्वी उपचार केलेले आहेत.