शांक्सी (चीन) – चीनच्या उत्तरेकडील शांक्सी प्रांतात एक हॉटेल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 29 जण ठार झाले आहेत. या ठिकाणी ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम आता समाप्त झाले आहे. चीनमधील वर्तमानपत्रांनी आज या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले.
लिन्फेन जिल्ह्यातले दोन मजली हॉटेल शनिवारी सकाळी कोसळले. या दुर्घटनेमध्ये 17 जण ठार तर अन्य 28 जण जखमी झाले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
मदत आणि बचाव कार्यादरम्यान आणखी १२ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्यांपैकी 7 जण गंभीर जखमी आहेत.
हे हॉटेल अचानक कोसळण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.