पिंपरी, (प्रतिनिधी) – दोन दिवस चाललेल्या थरमॅक्स कंपनीच्या सिनिअर मॅनेजमेंट क्रिकेट स्पर्धेच्या स्पर्धेत हिटिंग वॉरियर्स संघ विजयी झाला. एकूण ६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. हिटींग वॉरियर्स, एनव्हायरो अँड आरटीआयसी, पॉवर वॉरियर्स, टीबीडब्ल्यूईएस फाल्कन्स, डब्ल्यूडब्ल्यूएस व क्रॉस फंक्शनल टायगर्स या संघांनी भाग घेतला.
प्रास्ताविक गिरीश गायकवाड यांनी केले. पारितोषक वितरण प्रसंगी मीनल राव (एचआर हेड, आयपी), आनंद देशमाने (फॅक्टरी मॅनेजर),विशाल मेहरा(एसबीयु हेड),अजय हंतोडकर (इंजि. हेड),असद हुसेन(सीबीजी हेड) हे उपस्थित होते.
स्पर्धेचे संपूर्ण आयोजन गिरीश गायकवाड, स्टेला फ्रान्सिस, शीतल रावोटे, सुशील मालुसरे, अमितसिंग, चैतन्य ढोकळे, विशाल गवळी यांनी केले.आभार
प्रदर्शन हरी देशपांडे यांनी केले. स्पर्धेचा अंतिम फेरीचा “मॅन ऑफ द मॅच” मोहम्मद जावेद (हिटींग वॉरियर्स २) “बेस्ट बॅट्समन” हर्ष शर्मा (पावर वॉरियर्स)३) “बेस्ट बॉलर” अमोल सिंग चव्हाण (हिटींग वॉरियर्स) ४) “मॅन ऑफ द सिरीज” हरीश भंजन (हिटींग वॉरियर्स) पारितोषक यांना मिळाले.