Harbhajan Singh : ‘प्रेमाशिवाय मुलं झाली का?’ हरभजनच्या उत्तराने पत्नीसह बुमराह-संजनालाही आले खळखळून हसू, पाहा VIDEO

Harbhajan Singh’s Hilarious Response Viral : माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपेक्षा त्याच्या हूज द बॉस? या यूट्यूब शोमुळे चर्चेत आहे. हा शो तो त्याची पत्नी गीता बसरा यांच्यासोबत होस्ट करतो. या शोमध्ये क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नींना आमंत्रित केले जाते, जिथे ते त्यांच्या आयुष्यातील न सांगितलेल्या गोष्टी, मजेदार क्षण आणि नातेसंबंधातील खोल गोष्टी शेअर करतात.
हरभजन सिंगचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल –
ताज्या एपिसोडमध्ये टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपली पत्नी संजना गणेशनसह पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या शो दरम्यान एका हलक्या-फुलक्या पण अत्यंत रंजक क्षणी हरभजन सिंगच्या उत्तराने केवळ संजना आणि बुमराहच नव्हे, तर हरभजनची पत्नी गीता देखील खळखळून हसू लागली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शो दरम्यान गीता बसराने संजना गणेशनला मस्करीत विचारले की, बुमराह प्रेम व्यक्त करतात की तेही इतर पुरुषांप्रमाणे थोडे कठोर आहेत. याच संदर्भात तिने हरभजनवरही निशाणा साधत सांगितले की तेही जास्त प्रेमळपणा दाखवत नाहीत.
हरभजन सिंगच्या उत्तराने सर्वांना आले खळखळून हसू –
View this post on Instagram
हरभजन सिंह यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते हसू आवरू शकले नाहीत. त्यानी आपल्या पत्नीला उत्तर देताना म्हटलं, “मुलं असंच झाली का, प्रेमाशिवाय? दोन मुलं झालीत.’ यानंतर गीता बसरा म्हणाली मुलानंतर पण आयुष्य असतं. यावर हरभजन म्हणाला, मग आता दोननंतर तीन मुलं होतील.” हरभजनचं हे उत्तर ऐकताच संजना आणि बुमराह दोघेही हसू आवरू शकले नाहीत. ज्यामुळे सर्वच खळखळून हसू लागले. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला बाद करताच इंग्लंडच्या गोलंदाजाने गमावला संयम, रंगला नवा वाद!
बुमराहच्या दुसऱ्या कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह –
जसप्रीत बुमराह सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली आणि पहिल्या डावात ५ विकेट्स घेतले आणि सर्वांना प्रभावित केले. तथापि, ताज्या अहवालांनुसार, पुढील कसोटी सामना खेळणे त्याच्यासाठी कठीण वाटत आहे. संघ व्यवस्थापन वर्कलोड व्यवस्थापनाखाली दुसऱ्या कसोटीपासून त्याला विश्रांती देऊ शकते.





