Ritesh Deshmukh Post| अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ रितेश सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या व्हिडिओला चाहत्यांचा देखील चांगलाच प्रतिसाद मिळतो. त्यानंतर आता रितेशने वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
रितेशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये जिनिलिया आणि त्याची मुलं ही विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करताना दिसत आहे. रितेश देशमुखचे दिवंगत वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज 79 वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंबीय हे बाभळगाव येथील विलासबागेत उपस्थित राहिले.
View this post on Instagram
यावेळी सर्व देशमुख कुटुंब या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसत आहे. या फोटोला रितेशनं कॅप्शन दिलं, “हॅप्पी बर्थ-डे पप्पा”, या फोटोच्या बॅकग्राऊंडला ‘पापा मेरी जान’ हे गाणं ऐकू येत आहे. सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशमुख कुटुंबावर शोककळा पसरली. Ritesh Deshmukh Post|
दरम्यान, रितेशच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो बिग बॉस मराठी या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा ‘वेड’ हा हिट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर रितेशचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. त्याच्या या ऐतिहासिक चित्रपटांसाठी चाहते देखील उत्सुक आहेत. Ritesh Deshmukh Post|