चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची (H9N2 Update) प्रकरणे समोर आली आहेत. अशात चीनसह इतर देशांनी याविरोधात खबरदारी बाळगायला सुरुवात केली आहे. हा आजार लहान मुलांवर होतो. त्याची प्रकरणे उत्तर चीनमध्ये दिसून आली. तथापि, भारत सरकार चिनी मुलांमध्ये पसरणाऱ्या H9N2 प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (new disease started in China)
आरोग्य मंत्रालय H9N2 चा प्रादुर्भाव आणि चीनमधील मुलांमध्ये पसरणाऱ्या श्वसनाच्या आजारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरण तसेच चीनमध्ये नोंदवलेल्या श्वसन रोगाच्या क्लस्टर्सपासून भारताला धोका कमी आहे.चीनमधील इन्फ्लूएंझाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचे समजते. (chaina new virus)
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, काही मीडिया रिपोर्ट्सने उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत, त्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने देखील एक निवेदन जारी केले आहे.
Union Health Ministry is closely monitoring outbreak of H9N2 cases and clusters of respiratory illness in children in northern China. There is a low risk to India from both the avian influenza cases reported from China as well as the clusters of respiratory illness. India is… pic.twitter.com/vVCuA7c66s
— ANI (@ANI) November 24, 2023
सध्याच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची सामान्य कारणे समाविष्ट होती आणि कोणतेही असामान्य रोगजनक समोर आले नाहीत. मात्र याबाबत सर्वच देश खबरदारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे समजते.