पिंपरी, दि. 25 – स्वयंदीप सोशल फाउंडेशन आणि एस. के. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भोसरी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र इंगळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी व महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन जोगदंड यांच्या संकल्पनेतून दुबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला, मीनाझ फईम, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, तिक्षगत वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुगत वाघमारे, डॉ. विजय पोतदार आदी उपस्थित होते.
डॉ. रवींद्र इंगळे यांनी पिंपरी महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटल येथे प्राध्यापक म्हणून काम पाहिले असून ते भोसरी येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. मुलगी जन्माला आल्यास महिलेची प्रसूती पूर्ण मोफत करून “बेटी बचाव’ या राष्ट्रीय कार्यास ते हातभार लावत आहेत.