पौड -पौड पोलीस स्टेशन हद्दीत पौड गावात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पौड पोलिसांनी कारवाई केली असून, 91 हजार 962 रुपये किमतीचा गुटखा सापडला आहे.
गुटखा विक्री करणारी व्यक्ती महेंद्र उबाळे (रा. पौड) याच्या विरुद्ध पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्याची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेखा उपनिरीक्षक दूधभाते यांनी केली.