नवी दिल्ली – क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू गुरकीरत सिंग मानने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. फेज-3, मोहाली येथील रहिवासी असलेल्या गुरकीरतने 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. यासोबतच तो आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांमध्ये खेळला आहे.
भारतासाठी मधल्या फळीत फलंदाजी करण्यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत 10 षटकेही टाकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला पदार्पण करता आले नाही.
पाठदुखीमुळे मागील आयपीएल हंगाम आणि संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळू शकलो नाही. आता माझे शरीर सहकार्य करत नाही, असे माझ्या लक्षात आल्याने मी या निर्णयापर्यंत पोचलो आहे, असे त्याने या वेळी म्हटले आहे.